भोंग्याचा त्रास काय होतो, हे त्यांनाही समजू द्या ! राज ठाकरेंनी जाहीर केली भूमिका

मुंबई तक

औरंगाबाद येथील सभेत केलेल्या प्रक्षोभक विधानाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला राज ठाकरे यांच्यावर लावण्यात आलेली कलम जामीनपात्र आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीरपणे मांडत संपूर्ण देशभरातील हिंदू नागरिकांना आवाहन केलेलं आहे. सोशल मीडियावरुन केलेल्या आवाहनात राज ठाकरेंनी सावध भूमिका घेत मनसे कार्यकर्त्यांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

औरंगाबाद येथील सभेत केलेल्या प्रक्षोभक विधानाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला राज ठाकरे यांच्यावर लावण्यात आलेली कलम जामीनपात्र आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर राज ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीरपणे मांडत संपूर्ण देशभरातील हिंदू नागरिकांना आवाहन केलेलं आहे.

सोशल मीडियावरुन केलेल्या आवाहनात राज ठाकरेंनी सावध भूमिका घेत मनसे कार्यकर्त्यांना थेट आदेश देण्याऐवजी हिंदू नागरिकांना भोंग्यांविरुद्ध भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे. 4 मे रोजी जिथे यांचे भोंगे अजान आणि बांग देतील तिकडे आपण भोंग्यावर हनुमान चालीसा लावावी. भोंग्याचा काय त्रास होतो हे त्यांनाही समजू द्या, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरेंनी तीन पानी पत्रात आपली जाहीर भूमिका मांडून हिंदू जनतेला आवाहन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरच्या डेसीबल बद्दल घालून दिलेल्या नियमांचा दाखला देत राज ठाकरे यांनी मनसेने उचललेला हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक असल्याचं राज यांनी स्पष्ट केलं आहे. बहुतांश मशिदी अनधिकृत असताना सरकार त्यावर भोंगे लावायला परवानगी का आणि कशी देते? भोंग्यांमुळे होणारा ध्वनीप्रदूषणाचा त्रास हा देशातील सर्वधर्मीयांना होतो. ही बाब प्रत्येक सरकारला समजलीच पाहिजे. रस्त्यावर नमाजासाठी बसणं, वाहतूक कोंडी करणं हे कोणत्या धर्मात बसतं असा सवाल राज ठाकरेंनी आपल्या पत्रात विचारला आहे.

यापुढे बोलताना राज ठाकरेंनी जर या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल या भूमिकेचा राज यांनी पुनरुच्चार केला. आम्हाला देशात शांतता हवी आहे, दंगली आम्हालाही नको आहेत. परंतू आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp