“बापाचा अंदाज चुकीचा ठरवायचा हे मुलगीच करू शकते” शरद पवार सुप्रिया सुळेंबाबत असं का म्हणाले?
सुप्रिया राजकारणात पडेल हे मला वाटलं नव्हतं. मी ३० वर्षांपूर्वी मुलाखतीत ते बोललोही होतो. पण तुम्ही सगळे पाहात आहात की ती राजकारणात आली आहे. एका बापाचं असेसमेंट चुकीचं कसं आहे माझ्या मुलीनेच सिद्ध केलं असं भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. पुणे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सिंगल डॉक्टर फॅमिली या उपक्रमाची सुरूवात झाली. […]
ADVERTISEMENT

सुप्रिया राजकारणात पडेल हे मला वाटलं नव्हतं. मी ३० वर्षांपूर्वी मुलाखतीत ते बोललोही होतो. पण तुम्ही सगळे पाहात आहात की ती राजकारणात आली आहे. एका बापाचं असेसमेंट चुकीचं कसं आहे माझ्या मुलीनेच सिद्ध केलं असं भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. पुणे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सिंगल डॉक्टर फॅमिली या उपक्रमाची सुरूवात झाली. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत शरद पवारांनी हे भाष्य केलं. हे भाष्य करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
वेदांता ग्रुपवर माझा विश्वास नाही असं का म्हणाले शरद पवार?
काय घडलं मुलाखतीत?
ही मुलाखत घेत असताना एक AV प्ले करण्यात आली. ही AV एका मुलाखतीची होती. शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची मुलाखत ३० वर्षांपूर्वी जब्बार पटेल यांनी घेतली होती. त्यावेळी शरद पवार हे म्हणाले होते की सुप्रिया राजकारणात येईल असं मला वाटत नाही. शरद पवारांचं ते वाक्य ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सगळ्यांमध्येच हशा पिकला. ती क्लीप संपल्यानंतर शरद पवार म्हणाले की आत्ता तुम्ही जे पाहिलंत त्यात मी ३० वर्षांपूर्वी बोललो होतो. सुप्रिया राजकारणात येणार नाही. पण बापाचा अंदाज चुकवायचा कसा हे मुलगीच करू शकते. हे जेव्हा शरद पवार म्हणाले तेव्हाही सभागृहात हशा पिकला.