‘यातून काहीतरी शहाणपणा…’, शरद पवारांनी टोचले मोदी सरकारचे कान
–वसंत मोरे, बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मावळत्या वर्षाबद्दल भाष्य करताना आगामी वर्षाबद्दल काही अंदाज मांडले. यावेळी शरद पवारांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाबद्दल आणि अनिल देशमुख यांच्या जामिनाबद्दलही भूमिका मांडली. देशमुखांच्या जामिनावरील सुटकेबद्दल बोलताना पवारांनी मोदी सरकारचे कान टोचले. शरद पवार यांनी बारामती येथे माध्यमांशी संवाद साधला. 2022 या मावळत्या वर्षाबद्दल बोलताना पवार […]
ADVERTISEMENT

–वसंत मोरे, बारामती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मावळत्या वर्षाबद्दल भाष्य करताना आगामी वर्षाबद्दल काही अंदाज मांडले. यावेळी शरद पवारांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाबद्दल आणि अनिल देशमुख यांच्या जामिनाबद्दलही भूमिका मांडली. देशमुखांच्या जामिनावरील सुटकेबद्दल बोलताना पवारांनी मोदी सरकारचे कान टोचले.
शरद पवार यांनी बारामती येथे माध्यमांशी संवाद साधला. 2022 या मावळत्या वर्षाबद्दल बोलताना पवार म्हणाले, “आजची तारीख 31 डिसेंबर. आजच्या दिवशी संपूर्ण वर्षाचा आढावा घेतला तर गेल्या वर्षामध्ये देशासमोर, राज्यासमोर काही प्रश्न, काही चांगल्या गोष्टी या घडल्या. जे काही प्रश्न होते, त्या सगळ्यांच्यावर पर्याय शोधून सर्वसामान्य लोकांनी प्रश्न सोडवण्यासाठी सामना करण्याची आवश्यकता होती, ती केली. आज आपण त्या सगळ्यातून मुक्त झालेलो आहोत.”
2023 या नव्या वर्षाबद्दल पवारांनी काही अंदाज मांडले. “आज आपल्या सर्वांच्यासमोर एक नवीन चित्र उभं राहत आहे. ते नवीन चित्र म्हणजे 2023 आहे. याची सुरूवात 1 तारखेपासून होईल. देशामध्ये 54 ते 60 टक्के लोक शेती करतात. त्यामध्ये चांगले पर्याय निर्माण झाले, चांगला पाऊस झाला तर हे वर्ष चांगलं जायला काही हरकत नाही”, असं शरद पवार म्हणाले.