Rohit Pawar: नागपूरमध्ये मोठा राडा, रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेच्या शेवटच्या क्षणी घडलं तरी काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ncp mla rohit pawar yuva sangharsh yatra agitation raged in nagpur vidhan bhawan what if it happened at the last moment
ncp mla rohit pawar yuva sangharsh yatra agitation raged in nagpur vidhan bhawan what if it happened at the last moment
social share
google news

Rohit Pawar Yuva Sangharsh Yatra: नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या युवा संर्घष यात्रेत शेवटच्या टप्प्यात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 800 किमीचं अंतर कापून ही यात्रा नागपुरात (Nagpur) विधानभवनाजवळ येताच प्रचंड राडा झाला. आपल्या मागण्या आणि निवेदनं देण्यासाठी रोहित पवार यांनी थेट विधानभवन गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याआधीच या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने रोहित पवारांचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांसह आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. (ncp mla rohit pawar yuva sangharsh yatra agitation raged in nagpur vidhan bhawan what if it happened at the last moment)

विधानभवन परिसरात मोर्चा धडकू नये यासाठी पोलिसांकडून आधीच बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं. त्यामुळे रोहित पवारांसोबतचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी बॅरिकेटिंग पार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

हे ही वाचा>> Shivraj Singh यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडल्या महिला, नेमकं काय घडलं?

रोहित पवार यांनी राज्यभरात 800 किमीचा प्रवास करुन युवा संघर्ष यात्रेची सांगता आज (12 डिसेंबर) नागपुरात केली. पण शेवटच्या क्षणी या संपूर्ण संघर्ष यात्रेला गालबोटस लागलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नागपूरमध्ये रोहित पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे विधानभवन परिसरात जमा होत असल्याचं समजताच पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी बॅरिकेट्स लावत कार्यकर्त्यांना अडवलं. ज्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. त्यामुळे पोलिासांनी या सर्व कार्यकर्त्यांची धरपकड केली. त्यामुळे रोहित पवार यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन देखील केलं. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

‘यांना अंहकार आहे… आमदाराचं ऐकत नाही तर लोकांचं..’

आम्ही आवाहन केलं आहे की, कोणी तोडफोड करायची नाही.. त्यांना इथे यायला काय होतंय? तहसीलदारला पाठवता.. अरे 800 किमी आम्ही काय केलंय.. गरीबाचे विषय घेतले ना.. हे सामान्य लोकांचे पोरं आहे.

गरीबांचं या लोकांना काही पडलेलं नाही, त्यांना फक्त फाईली पास करायच्या आहेत, कमिशन घ्यायचं आहे. जर आज पंचनामे होत नसतील, शेतकरी अडचणीत असतील, विम्याचे पैसे मिळत नाही, अनुदान नाही.. या मुद्द्यावर चर्चा व्हावी. हे मुद्दे घेऊन आम्ही चाललो आहोत. याच्याआधी आम्ही पत्र दिलं. पोलिसांना सांगितलं, ते म्हणाले शहराचा अध्यक्ष येईल.

अरे हे सामान्य लोकांना सोडत नाही, लाठचार्ज करतात, शेतकऱ्यांची, गरीबांची पोरं आहेत ही.. शेतकऱ्यांचे युवांचे प्रश्न सोडवा.. पण यांना अहंकार आहे.. तहसीलदारला हे पाठवतात. भाजप शहराध्यक्षांना पाठवतात. मग एकनाथ शिंदेंना ताकद नाही? हे लोकं आमदारांचे ऐकत नसतील तर ते गरीबांचे काय ऐकणार? अधिवेशनात मुद्दे मांडले त्यावर चर्चा झाली नाही.

आमच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहचवल्या आहेत. आमचं म्हणणं होतं की, आम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी बोलायचंय. 800 किमीमध्ये जे काही जनतेकडून निवदेनं आली.. आमची मागणी होती की, यावर सरकारने चर्चा करावी.

हे ही वाचा>> Ajit Pawar: ‘गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबरला नसतो’, अजितदादांनी सांगितलेला ‘तो’ किस्सा जसाच्या तसा…

असं म्हणत रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमकपणे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. ज्यानंतर रोहित पवार यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT