एका दिवसात विठ्ठल बदलला?.. गुवाहटीला पोचताच गुलाबराव पाटील एकनाथ शिंदेच्या पाया पडले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी प्रचंड मोठं बंड करुन शिवसेनेला मुळापासून हादरवून टाकलं आहे. थोडे-थोडके नव्हे तर 35 हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडले आहेत. मात्र, आता एक अशी घटना समोर आली आहे की, ज्यामुळे शिवसैनिकांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेने अनेक सामान्य कार्यकर्त्यांना मंत्रिपदापर्यंत पोहचवलं आहे. सत्तेतील अनेक मोठी पदं दिलं आहेत. अशापैकीच जळगावचे शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्री असलेले गुलाबराव पाटील.

गुलाबराव पाटील यांची खरी ओळख म्हणजे कट्टर शिवसैनिक अशी आहे. अगदी सामान्य शिवसैनिक असलेले गुलाबराव पाटील यांना दोन्ही टर्ममध्ये उद्धव ठाकरे यांनी मंत्री केलं होतं. त्यामुळे गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक असल्याचं बोललं जात होतं. मात्र याच गुलाबराव पाटलांनी एका दिवसात आपला ‘विठ्ठल’ बदलल्याचं चित्र पाहायला मिळालं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गुलाबरावांनी एका दिवसात विठ्ठल बदलला?

यापूर्वी उद्धव ठाकरेंवर कोणीही टीका केली तर त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी गुलाबराव पाटील हे कायम सज्ज असायचे. अगदी ते राणेंनाही शिंगावर घ्यायचे. त्यामुळे काल जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड घडवून आणलं तेव्हा गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही अशी शिवसेनेतील अनेक नेत्यांची खात्री होती.

ADVERTISEMENT

मात्र, सगळ्या घडामोडींना 24 तास उलटत नाही तोच गुलाबराव यांनी राजकीय हवा ओळखून थेट गुवाहटीला धाव घेतली. गुलाबराव फक्त गुवाहटीलाच गेले नाही तर तेथील हॉटेलमध्येच पोहचताच ते चक्क एकनाथ शिंदे यांच्याच पाया पडले. दरम्यान, हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गुलाबराव पाटील यांच्या या कृतीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे.

ADVERTISEMENT

कधी काळी उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे गुलाबराव हे राजकीय हवा बदलताच अशा पद्धतीने बदलल्याने त्यांच्याबाबत आता प्रचंड आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनेक सामान्य शिवसैनिक आता विचारत आहेत की, गुलाबराव यांनी एका दिवसात आपला विठ्ठल कसा काय बदलला?

CM उद्धव ठाकरेंच्या भाषणाला एकनाथ शिंदेंनी दिलं प्रत्यत्तुर, म्हणाले…

असं नेहमी म्हटलं जातं की, राजकारण हे कधीही भावनेच्या आहारी जाऊन केलं जात नाही. मात्र, शिवसेनेचं राजकारण हे कायमच भावनेवर चालत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारावर शिवसैनिकांच्या भावना प्रचंड तीव्र स्वरुपाच्या आहेत.

मात्र, असं असलं तरीही शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी अजिबात भावनावश न होता अत्यंत व्यावहारिक विचार करत एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतं आहे. यासाठीच त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून गुवाहटीला जाणं पसंत केलं.

सगळ्यात घडामोडीतून गेल्या दोन दिवसात असं पाहायला मिळालं आहे की पक्षीय राजकारण, निष्ठा, वचन या सगळ्या गोष्टी गौण आहेत. फक्त आणि फक्त सत्ता आणि सत्तेचं सोपान गाठण्यासाठी राजकीय नेते कोणतीही तडजोड करायला तयार असतं. कधी काळी उद्धव ठाकरे हेच आपले सर्वोच्च नेते असल्याचे म्हणणारे गुलाबराव आज वेळ बदलताच एकनाथ शिंदेच्या पायाशी लीन झाल्याचं पाहायला मिळालं. बहुदा यालाच राजकारण असं म्हणतात!

    follow whatsapp

    ADVERTISEMENT