अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या ठरावाला मंजुरी
औरंगाबाद आणि उस्मानाबाद दोन्ही शहराच्या नावाला बदलण्याच्या प्रस्तावाला शिंदे सरकारने मंजुरी दिली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नाव करण्याचा निर्णय शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला होता. यासह नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील हे नाव देण्याचा निर्णय झाला होता. या ठरावाला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंजुरी देण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंचा सरकारला सल्ला यावर बोलताना […]
ADVERTISEMENT

औरंगाबाद आणि उस्मानाबाद दोन्ही शहराच्या नावाला बदलण्याच्या प्रस्तावाला शिंदे सरकारने मंजुरी दिली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव नाव करण्याचा निर्णय शिंदे सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला होता. यासह नवी मुंबई विमानतळाला दी. बा. पाटील हे नाव देण्याचा निर्णय झाला होता. या ठरावाला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंजुरी देण्यात आली आहे.
आदित्य ठाकरेंचा सरकारला सल्ला
यावर बोलताना आमदार आदित्य ठाकरे म्हणाले जशापद्धतीने आज संभाजीनगर, धाराशीव आणि दी. बा पाटील या नामांतराचे ठराव झाले. त्याचपद्धतीने दोन वर्षांपूर्वी संभाजीनगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज असा नाव देण्याचा ठराव झाला होता. त्याचाही पाठपुरावा सरकारने करावा, असं आदित्य यांनी सुचवलं आहे.
20 दिवसात कॅबिनेटमध्ये दोनदा घेण्यात आला होता नामांतराचा निर्णय