PM Modi : नेहरू भारतीयांना खरंच आळशी म्हणाले होते का? 1959 मधील ‘त्या’ भाषणात काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

pm modi address lok sabha former prime minister nehru 1959 indian laziness read that speech 1959
pm modi address lok sabha former prime minister nehru 1959 indian laziness read that speech 1959
social share
google news

Jawahar Lal Nehru Full Speech 1959:  देशाचे पहिले पंतप्रधान (जवाहरलाल नेहरू) देशातील लोकांना आळशी आणि कमी हुशार समजायचे, अशी टीका सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्यावर केली होती. त्यामुळे जवाहरलाल नेहरूंनी खरंच भारतीयांना आळशी म्हटलं होतं का? नेहरूंनी 1959 सालच्या लाल किल्यावरील भाषणात नेमकं काय म्हटलं हे जाणून घेऊयात. (pm modi address lok sabha former prime minister nehru 1959 indian laziness read that speech 1959)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर लोकसभेत उत्तर दिले. यावेळी मोदी यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 1959 सालच्या भाषणाचा उल्लेख केला होता. तसचे त्यांचे भाषण देखील लोकसभेत वाचून दाखवले. ‘भारतात साधारणपणे कष्ट करण्याची सवय नाही. युरोप, जपान, चीन, रशिया किंवा अमेरिकेतील लोक जेवढे काम करतात तेवढे काम आम्ही केले नाही. असे समजू नका की हे समुदाय जादूने सुखी झाले, ते कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेने आनंदी झाले.’ मोदी पुढे म्हणाले की, याचाच अर्थ नेहरूजींना वाटत होते की. भारतीय आळशी आहेत आणि युरोपियन लोकांपेक्षा कमी बुद्धिमत्ता आहे, असे मोदी यांनी सांगितले. त्यामुळे नेहरूंनी खरंच भारतीय आळशी म्हटलंय का? हे जाणून घेऊयात.

हे ही वाचा : NCP : अजित पवार-जितेंद्र आव्हाडांतील संघर्ष टोकाला! ‘नाटकीबाज’वर म्हणाले ‘कावळा’

लाल किल्ल्यावरून नेहरू काय म्हणाले होते?

जवाहरलाल नेहरू यांनी 1959 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनात लाल किल्ल्यावरून भाषण दिले होते. या भाषणात नेहरू म्हणाले की, ‘कष्ट करण्याची सवय भारतात कमी-अधिक प्रमाणात नाही. यात आपला दोष नाही, कधी कधी अशा सवयी तयार होतात. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण युरोप, जपान, चीन, रशिया किंवा अमेरिकेतील लोकांइतके कष्ट घेत नाही.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘हे देश जादुईपणे एका रात्रीत विकसित झाले आहेत असे नाही. कठोर परिश्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे हे देश विकसित झाले आहेत. आपणही मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करू शकतो, याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपण कोणत्याही जादूने पुढे जाऊ शकत नाही. कारण हे जग माणसाच्या कामावर चालते, माणसाच्या मेहनतीतूनच संपूर्ण जगासाठी संपत्ती निर्माण होते, मग ते शेतकरी जमिनीवर असो वा कारखान्यात असो किंवा दुकानात असो.’

हे ही वाचा : नो बॉलच्या वादात जीव घेतला, क्रिकेटच्या मैदानात नेमकं काय घडलं?

‘काही मोठे अधिकारी कार्यालयात बसून व्यवस्था करतात, ते संपत्ती निर्माण करत नाहीत, असे नेहरू म्हणाले होते. शेतकरी आणि कारागीर त्यांच्या कष्टातून संपत्ती निर्माण करतात. त्यामुळे आपली मेहनत वाढवावी लागेल’, असे नेहरूंनी म्हटले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT