प्रमोद महाजन यांनी शिवसेनेविषयीचं ‘हे’भाकित आधीच केलं होतं, काय होतं ते वक्तव्य?
भाजपला शिवसेनेसह सगळेच प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केला. याचं कारण होतं जे. पी. नड्डा यांनी केलेलं एक वक्तव्य. मात्र भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी एक भाष्य शिवसेनेबाबत केलं होतं. राजदीप सरदेसाई आणि प्रकाश अकोलकर यांनी मुंबई तकशी बोलताना यांनी ही आठवण सांगितली आहे. काय म्हणाले होते […]
ADVERTISEMENT

भाजपला शिवसेनेसह सगळेच प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केला. याचं कारण होतं जे. पी. नड्डा यांनी केलेलं एक वक्तव्य. मात्र भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी एक भाष्य शिवसेनेबाबत केलं होतं. राजदीप सरदेसाई आणि प्रकाश अकोलकर यांनी मुंबई तकशी बोलताना यांनी ही आठवण सांगितली आहे.
काय म्हणाले होते जे. पी. नड्डा?
सगळे लोक संपले आहेत. मिटले आहेत. जे नाही संपले, ते संपून जातील. फक्त भाजप राहिल. एका विचारामुळे आपण लढत आहोत. विचारांमुळे जोडले गेलेलो आहोत. कार्यकर्त्यांचा बेस बनतो तो पक्ष कार्यालयात असं वक्तव्य जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. यानंतर भाजपला शिवसेना संपवायची आहे असा आरोप यांनी केला. याबाबत मुंबई तकच्या आजचा मुद्दा कार्यक्रमात प्रकाश अकोलकर आणि राजदीप सरदेसाई यांनी प्रमोद महाजन यांनी शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्याची आठवण सांगितली.
काय म्हणाले होते प्रमोद महाजन शिवसेनेबाबत?
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर भाजप हा राज्यात क्रमांक १ चा पक्ष होईल. तसंच शिवसेना कमकुवत होईल असं वक्तव्य प्रमोद महाजन यांनी केलं होतं. प्रकाश अकोलकर आणि राजदीप सरदेसाई या दोघांनीही ही आठवण सांगितली. मागच्या आठ वर्षांपासून नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. जिथे त्यांचा प्रतिस्पर्धी काँग्रेस आहे तिथे भाजपचं वर्चस्व आहे.
बंगालमध्ये जी निवडणूक पार पडली त्यात ममता बॅनर्जी रिजनल कार्ड खेळल्या. मोदी आणि शाह हे बाहेरचे आहेत हे दाखवण्यात ममता यशस्वी झाल्या आणि निवडणूक जिंकल्या. तर दुसरीकडे केरळमध्येही असंच चित्र पाहण्यास मिळालं. जिथे प्रादेशिक भावना कट्टर आहेत तिथे भाजप बाहेरचा आहे हे पक्षांना दाखवणं सोपं असतं असं राजदीप सरदेसाईंनी म्हटलं आहे.