लोकसभेला पराभूत झालेल्या हंसराज अहिरांचं पुनर्वसन; मोदी सरकारने दिली नवी जबाबदारी

मुंबई तक

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांची केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला. या नियुक्तीमधून एकप्रकारे अहिर यांचं २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुनर्वसन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कोण आहेत हंसराज अहिर? हंसराज गंगाराम अहिर हे महाराष्ट्राच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांची केंद्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री याबाबतचा आदेश जारी करण्यात आला. या नियुक्तीमधून एकप्रकारे अहिर यांचं २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पुनर्वसन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

कोण आहेत हंसराज अहिर?

हंसराज गंगाराम अहिर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नावं मानलं जातं. कार्यकर्ते त्यांना हंसराज भैय्या या नावानं ओळखतात. १९९४ ते १९९६ साली ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य होते. त्यानंतर १९९६, २००४, २००९ आणि २०१४ असे ४ वेळा ते चंद्रपूरमधून भाजपतर्फे लोकसभेवर निवडून गेले. २०११ ते २०१४ असे सलग चार वर्ष अहिर यांना संसद रत्न म्हणूनही गौरविण्यात आलं आहे. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांची केंद्रीय मंत्री म्हणून वर्णी लागली होती.

कोळसा खाण वाटप घोटाळा उघडकीस आणणारे नेते :

देशातील गाजलेला कोळसा खाण वाटप घोटाळा उघडकीस आणणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. या घोटाळ्याला कोलगेट असेही म्हणतात. त्यांच्याच प्रयत्नांनंतर सर्वोच्च न्यायालयाने 2014 मध्ये चार वगळता सर्व कोळसा खाणींचे वाटप रद्द केले होते. ते काही दिवस संसदेच्या कोळसा, स्टील आणि खाण समितीमध्ये सदस्यही होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp