'vedanta-foxconn Project अग्रवाल यांच्या इच्छेविरोधात गुजरातला नेला'; मोदी सरकारवर गंभीर आरोप

prithviraj chavan on vedanta-foxconn semiconductor plant : 'मोदींचा एकदा शब्द आला की, देवेंद्र फडणवीस यांना चकार शब्दही काढता येत नाही'
Vedanta-Foxconn semiconductor plant : narendra modi, anil agarwal, prithviraj chavan
Vedanta-Foxconn semiconductor plant : narendra modi, anil agarwal, prithviraj chavan

वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट फॉक्सकॉन कंपनीचे मालक आणि वेदांता कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या इच्छेविरोधात गुजरातला नेण्यात आला, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केला आहे.

कराड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक धक्कादायक आरोप मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण : शिंदे-फडणवीस सरकारमुळे फॉक्सकॉन-वेदांता प्रोजेक्ट गुजरातला गेला

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'डबल इंजिन सरकारमुळे (शिंदे-फडणवीस सरकार) आता फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गेला आहे. फॉक्सकॉनचा प्रकल्प १ लक्ष ५४ हजार कोटींचा प्रकल्प, जो अंतिम झाला होता. गुजरातचं त्यात कुठंही नाव नव्हतं. अचानक जाहीर करून टाकलं की गुजरातला गेला. त्या कंपनीला सांगितलं गेलं की, भारत सरकारचं अनुदान हवं असेल, तर असा निर्णय घ्या', असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर केला आहे.

Vedanta-Foxconn semiconductor plant : narendra modi, anil agarwal, prithviraj chavan
मोदींना काय अधिकार?; 'वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट'वरून पृथ्वीराज चव्हाण संतापले

'गुजरातमध्ये कुठल्या गावाला तो प्रकल्प करणार हे माहिती नाही. जागा निश्चिती नाही. काहीच नाही. महाराष्ट्रात जागा निश्चित झाली होती. तळेगावमध्ये येणार होता. जमीन, सातबारा वगैरे सगळं झालं होतं. हुकुमशाही पद्धतीने हा निर्णय घेतला गेलाय', असं पृथ्वीराज चव्हाण यांनी फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्पावर बोलताना म्हटलं आहे.

'हा प्रकल्प देशाचा महत्त्वाचा आहे. कारण त्या विषयात आपण मागासलेलो आहोत. फॉक्सकॉन कंपनीच्या तेव्हाच्या मालकाविरोधात आणि भारतीय संयुक्त कंपनी वेदांताचे अध्यक्ष अगरवाल यांच्या इच्छेविरोधात, त्यांनी निश्चित केलेलं स्थळ बाजूला करून तुम्ही (मोदी सरकार) मनमानी करून दुसऱ्या स्थळी नेता. या डबल इंजिन सरकारचा फटका महाराष्ट्राला असा बसतो. मोदींचा एकदा शब्द आला की, देवेंद्र फडणवीस यांना चकार शब्दही काढता येत नाही', असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Vedanta-Foxconn semiconductor plant : narendra modi, anil agarwal, prithviraj chavan
महाराष्ट्रातून गुजरातला नेलेला सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रोजेक्ट काय? तो का महत्त्वाचा आहे?

आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र मोदींनी एका रात्रीत गुजरातला हलवला -पृथ्वीराज चव्हाण

आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर आरोप केले आहेत. 'मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र विकसित करायचं हे आमचं स्वप्न होतं. त्यासाठी मुंबईपेक्षा दुसरं कुठलंही ठिकाण त्या प्रकल्पासाठी नव्हतं. त्याला लागणाऱ्या गोष्टींची चर्चा सुरू होती. पण, नरेंद्र मोदी सरकारने एका रात्रीत हा प्रकल्प हलवला आणि अहमदाबादजवळ गिफ्ट सिटीत नेला', असं चव्हाण म्हणाले.

'त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मुंबईचं महत्त्व कमी करून अहमदाबादचं महत्त्व वाढावं यासाठी हे केलं होतं. त्याला आम्ही विरोध केला. पण तो प्रकल्पही गेला. मुंबईला आंतरराष्ट्रीय प्रवासी खूप येतात, कारण ये-जा करणाऱ्या प्रवासी विमानांची संख्या खूप आहे. अहमदाबादला ते नाही. आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रात व्यवहार करण्यासाठी लोक येणार नाहीत, अशी स्थिती आहे आणि त्यामुळे सरकारच्या डोक्यातून बुलेट ट्रेनची कल्पना निघाली. आर्थिक सेवा केंद्रात जाता यावं म्हणून महिनाभरात बुलेट ट्रेनचा निर्णय घेतला गेला', असं चव्हाणांनी म्हटलं आहे.

Vedanta-Foxconn semiconductor plant : narendra modi, anil agarwal, prithviraj chavan
फॉक्सकॉन-वेदांताचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यामागे मोदी सरकार?

'मुंबईकरांना सांगा, आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र आणि बुलेट ट्रेनचा काय फायदा?'

'माझा आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा प्रश्न विचारायचं की, महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यानं, उद्योगपतीनं तुम्हाला बुलेट ट्रेन सुरू करायची मागणी केली होती. बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा होणार आहे. बुलेट ट्रेनचा ४० ते ४५ टक्के खर्च महाराष्ट्राने का उचलला आहे. याची माहिती दिली पाहिजे. मोदींच्या हट्टासाठी हा प्रकल्प मंजूर झालाय. जपानच्या कर्जाची यिन मध्ये परतफेड करायची आहे', असा मुद्दा चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

'बीकेसी हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाणी आहे. तेथील हजारो कोटी रुपयांची जागा या बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी दिली गेलीये. तिथे नवीन उद्योग, कंपन्या आल्या असत्या. याचा परिणाम मुंबईचं महत्त्व कमी होणार आहे. अहमदाबादचं वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत', असा दावा करत पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

'मुंबईतील मतदारांना देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगावं की, बुलेट ट्रेनमुळे आणि वित्तीय सेवा केंद्र अहमदाबादला गेलं याचा मुंबईकरांना किती फायदा झाला? मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत हा विषय होणारच आहे', असंही चव्हाण म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in