संभाजीनगरच्या उरावर आधुनिक रझाकार आणि ‘सजा’कार दोन्ही येऊन बसलेत : राज ठाकरे

मुंबई तक

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने आज राज्यात शिवसेनेत ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा वाद रंगला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता झेंडावंदनाचा कार्यक्रम ठरला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी 7 वाजताच येऊन झेंडावंदन केल्याने शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि नेते चंद्रकांत खैरे यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच याचा निषेध म्हणून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने आज राज्यात शिवसेनेत ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा वाद रंगला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजता झेंडावंदनाचा कार्यक्रम ठरला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी 7 वाजताच येऊन झेंडावंदन केल्याने शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि नेते चंद्रकांत खैरे यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच याचा निषेध म्हणून मुख्यमंत्र्यांनी ज्या ठिकाणी झेंडावंदन केले त्याच ठिकाणी नंतर जाऊन अभिवादन केले.

दरम्यान मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. राज ठाकरे यांनी एक पत्र सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. यात शिवसेना आणि एमआयएमवर टीका केली आहे. संभाजीनगरकरांच्या उरावर ‘सजा’कार पण येऊन बसलेत असे म्हणत शिवसेनेवर जहरी टीका केली. तर, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा सणासारखा साजरा होत नसल्याबद्दल खंतही व्यक्त केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

सस्नेह जय महाराष्ट्र!

आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस. आजचा दिवस खरं तर संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाला हैद्राबाद हे स्वतंत्र राष्ट्रच हवं होतं आणि त्यासाठी त्याची कितीतरी वर्ष आधी तयारी सुरु होती. कल्पना करा की जर त्याचा हा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे.

हे वाचलं का?

    follow whatsapp