Rajya Sabha Election : बंटी पाटील मैदानात, धनंजय महाडिकांना देणार धक्का?; मुश्रीफ काय म्हणाले?
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपनं माजी खासदार धनंजय महाडिकांना उमेदवारी दिली आणि चर्चा सुरू झाली ती सतेज पाटलांची. धनंजय महाडिक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर सतेज पाटील काय खेळी करणार याचीच चर्चा होती. मात्र ते फारसे समोर दिसले नाहीत. मात्र राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विधानाने सतेज पाटलांनी राज्यसभेची निवडणूक मनावर घेतलेली असल्याचं स्पष्ट झालंय. कोल्हापूरचं राजकारण गेल्या […]
ADVERTISEMENT

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपनं माजी खासदार धनंजय महाडिकांना उमेदवारी दिली आणि चर्चा सुरू झाली ती सतेज पाटलांची. धनंजय महाडिक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर सतेज पाटील काय खेळी करणार याचीच चर्चा होती. मात्र ते फारसे समोर दिसले नाहीत. मात्र राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विधानाने सतेज पाटलांनी राज्यसभेची निवडणूक मनावर घेतलेली असल्याचं स्पष्ट झालंय.
कोल्हापूरचं राजकारण गेल्या काही वर्षांत सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्याभोवतीच फिरत आलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, गोकूळ दुध महासंघ ते अलिकडेच झालेली विधानसभेची पोटनिवडणूक अशा सर्वच छोट्या मोठ्या निवडणुकांत सतेज पाटलांनी वर्चस्व दाखवून दिलं.
बंटी पाटील मुन्ना महाडिकांना विजयाचा गुलाल उधळू देणार?, दोघांमधील संघर्ष कधी उफाळून आला?
त्यामुळे धनंजय महाडिकांना उमेदवारी मिळाल्यानंतर सतेज पाटील यांची रणनीती काय असेल, अशी चर्चा सुरू झाली. धनंजय महाडिकांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून सतेज पाटील या प्रक्रियेत फारसे दिसले नाही. मात्र, सतेज पाटील या निवडणुकीत पडद्यामागे राहून काम करत असल्याचं समोर आलंय.