शिंदेंनी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री आणि गृह खातं मागितलं होतं : सामनात खळबळजनक दावा
मुंबई : 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असतानाच शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युतीचा प्रस्ताव दिला होता आणि तो प्रस्ताव विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे घेवून आले होते, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच केला. या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात आरोप – प्रत्यारोपांचे वादळ उठले आहे. चव्हाण यांनी या गौप्यस्फोटातुन शिंदे यांची कोंडी केली आहे. दरम्यान त्यांच्या या […]
ADVERTISEMENT

मुंबई : 2014 मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असतानाच शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युतीचा प्रस्ताव दिला होता आणि तो प्रस्ताव विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे घेवून आले होते, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच केला. या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात आरोप – प्रत्यारोपांचे वादळ उठले आहे.
चव्हाण यांनी या गौप्यस्फोटातुन शिंदे यांची कोंडी केली आहे. दरम्यान त्यांच्या या गौप्यस्फोटाला शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधूनही दुजोरा देण्यात आला आहे. शिंदे यांनी दिल्लीत काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांची भेट घेतली होती आणि गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपद द्या ही चर्चा सुरू केली होती, असा दावाही सामनामधील आजच्या अग्रलेखात करण्यात आला आहे.
काय म्हटले आहे सामना अग्रलेखामध्ये ?
महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी दिल्लीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची भेट घेतली होती. तेव्हाही त्यांच्या मनात वेगळे विचार होते. सौदेबाजी फिसकटली इतकेच, असे पुराव्यासह सांगणारे अनेक लोक आजही त्यांच्या अवतीभोवती आहेत. एवढेच नव्हे तर अशोक चव्हाण यांनीही आता शिंदे सत्तेसाठी किती उतावीळ झाले होते याचा स्फोट केला आहे.
2014 मध्ये भाजप-शिवसेना ‘युतीचे सरकारमध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे एक शिष्टमंडळ काँग्रेस नेत्यांना भेटले व नव्या सरकार स्थापनेचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. त्यात स्वतः एकनाथ शिंदे होते”, असे चव्हाण यांनी सांगितले. म्हणजे तेव्हा शिंदे यांनी काँग्रेसबरोबर जाण्यास विरोध केला नव्हता व काँग्रेसबरोबर गेल्याने ‘ठाकरे-दिघे’ यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा वारसा मोडून पडेल असे त्यांना वाटले नव्हते.
“गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपद द्या” :
15 ते 20 आमदारांसह येतो’, गृहमंत्रीपदासह उपमुख्यमंत्रीपद द्या ही चर्चा शिंदे यांनी सुरू केली होती, असे ठामपणे सांगणारे आहेत. त्याला आजही प्रत्यक्षदर्शी आहेत. शिंदे काँग्रेसशी चर्चा करीत आहेत ही पहिली खबर तेव्हा भाजपनेच उद्धव ठाकरे यांच्याकडे नोंदवली होती.
‘ईडी’च्या भीतीने शिंदे भाजपमध्ये :
‘ईडी’च्या भीतीने शिंदे हे भाजपमध्ये गेले. कारण ठाणे महानगरपालिका, समृद्धी महामार्ग, नगरविकास खाते या माध्यमांतून पैसाच पैसा. त्या पैशातून सत्ता. सत्तेतून पुन्हा पैसा, या दुष्टचक्रात ते पूर्ण अडकले. नाही तर शिंदे आदमी काम का था असे उघड बोलले जाते. मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा असणे वेगळे व लालसा असणे वेगळे. शिंदे हे लालसेचे बळी ठरले.