Ajit Pawar: अजित पवार पुन्हा तेच म्हणाले, ‘संभाजीराजे धर्मवीर नाहीच..’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Ajit Pawar Statement: मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Sambhaji Maharaj) हे धर्मवीर नाहीत असं वक्तव्य केल्याने सत्ताधारी पक्षाने अजित पवारांना प्रचंड टार्गेट केलं. त्यानंतर आज (4 डिसेंबर) अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी देखील अजित पवार यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे की, संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते. ते स्वराज्यरक्षकच होते. त्यामुळे मी माझ्या मतावर ठाम आहे. (sambhaji maharaj is not a dharmaveer ajit pawar is firm on his opinion)

‘छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक असे वर्षानुवर्षे म्हटलं जात होतं. महात्मा जोतिराव फुले यांनी महाराजांना कूळवाडी भूषण म्हटलं आहे. गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे चुकीचं नाही. पण तसं म्हणणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना एका मर्यादित कर्तृत्वात बंदिस्त करण्यासारखं आहे.’

‘धर्मवीर या छत्रपती संभाजी महाराजांच्या उपाधीचेही तसंच आहे. त्यामुळे संभाजीमहाराजांचे कर्तृत्व मर्यादित होते. स्वराज्यरक्षक ही उपाधी अधिक व्यापक आहे. असं मला वाटतं.’ असं म्हणत अजित पवार हे आपल्या मतावर ठाम असल्याचं सांगितलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Ajit Pawar: शरद पवारांनी पिळले कान, अजित पवार मागणार माफी?

पत्रकार परिषदेत अजित पवार काय म्हणाले?

‘माझा राजीनामा वैगरे मागण्याऐवजी ज्यांनी महापुरुषांचे अपमान केले आहेत त्यांच्याविषयी भाजपची काय भूमिका हे देखील स्पष्ट करावं.’

ADVERTISEMENT

‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात विधानसभेतील भाषणाची जी भूमिका आहे ती मांडलेली आहे. त्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझं इतिहासाचं वाचन आणि आकलन याच्या आधारे माझी जी भूमिका तयार झाली ती मी विधानसभेत मांडलेली आहे. मी काही इतिहास तज्ज्ञ नाही किंवा मी काही फार लिखाण केलंय असं नाही. मी इतिहासाचा संशोधक नाही.’

ADVERTISEMENT

‘राजकीय हेतूने वातावरण तापवणं, द्वेषाचं राजकारण करणं हे कदापि माझ्यासारख्याला मान्य नाही. नव्या अद्ययावत पुराव्यांच्या आधारे इतिहासाची सतत मांडणी होत असते. त्यामध्ये रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत. हे इतिहासकारांनी मांडलं आणि महाराष्ट्राने ते मान्य केलं त्यानंतरच महाराष्ट्र सरकारने दादोजी कोंडदेव पुरस्कार बंद केला.’

अजित पवारांकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान? भाजप नेत्यांनं केली मोठी मागणी

‘राहिला मुद्दा छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणायचं की, धर्मवीर म्हणायचं.. तर स्वराज्यरक्षक म्हणावे हीच माझी भूमिका आहे. पवार साहेब म्हणाले की, धर्मवीर म्हणत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक असे वर्षानुवर्षे म्हटलं जात होतं. महात्मा जोतिराव फुले यांनी महाराजांना कूळवाडी भूषण म्हटलं आहे. गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे चुकीचं नाही. पण तसं म्हणणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना एका मर्यादित कर्तृत्वात बंदिस्त करण्यासारखं आहे.’

‘धर्मवीर या छत्रपती संभाजी महाराजांच्या उपाधीचेही तसंच आहे. त्यामुळे संभाजीमहाराजांचे कर्तृत्व मर्यादित होते. स्वराज्यरक्षक ही उपाधी अधिक व्यापक आहे. असं मला वाटतं.’

‘सात-आठ लोकांनी स्वत:ला धर्मवीर उपाधी लावली आहे. यावर सिनेमे देखील येत आहेत. जर तुम्ही संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणत असाल तर दुसरा कोणी तशी व्यक्ती होऊच शकत नाही. जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना ही शिवाजी महाराजांनी केली दुसरी व्यक्ती ही शिवाजी महाराज होऊच शकत नाही. तशा पद्धतीने स्वराज्यरक्षकाची जबाबदारी संभाजी महाराजांनी पार पाडली. दुसरं कोणाला स्वराज्यरक्षक म्हणता येणार नाही. असं माझं म्हणणं आहे. अर्थात माझं मत 100 टक्के तुम्हाला पटलंच पाहिजे असं माझं म्हणणं नाही.’

‘मी पुन्हा सांगतोय मी वादग्रस्त विधान केलेलं नाही. वादग्रस्त विधान हे भाजपचे राज्यपाल, मंत्री आणि प्रवक्त्यांनी केलं आहे. मी माझ्या विधानावर ठाम आहे.’ असं अजित पवार यावेळी म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT