'न्यायव्यवस्थेवर दबाव...', महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाआधी संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य - Mumbai Tak - sanjay raut reaction on maharashtra political dispute there is no pressure on the judiciary then justice served - MumbaiTAK
बातम्या राजकीय आखाडा

‘न्यायव्यवस्थेवर दबाव…’, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाआधी संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य

Sanjay raut reaction on maharashtra political dispute :महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्ट 11 मे रोजी निकाल देणार आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. या निकालावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रतिक्रिया दिली आहे.
sanjay raut reaction on maharashtra political dispute there is no pressure on the judiciary

Sanjay raut reaction on maharashtra political dispute :महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्ट 11 मे रोजी निकाल देणार आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. या निकालावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut)  प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा उद्याचा फैसला अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून आम्ही आशावादी आहोत. कायद्याचा विजयी होईल आणि उद्या आम्हाला न्याय मिळेल,असे संजय राऊत म्हणाले आहेत. (sanjay raut reaction on maharashtra political dispute there is no pressure on the judiciary then justice served)

पाकिस्तान आज जळतंय, कारण ते सविधानानुसार चाललं नाही.विरोधकांर सुडबुद्धीने कारवाया सुरू आहेत. सरकारे पाडली जातायत, सरकारे आणली जातायत. न्याय व्यवस्था विकली जातेय, हे चित्र देशामध्ये असू नये म्हणून, सर्वोच्च न्यायालयाचा उद्याचा निकाल अत्यंत महत्वाचा असल्याचे राऊत म्हणाले आहेत. आम्ही असं अजिबात म्हणत नाही, की निकाल आमच्या बाजूने लागेल. न्यायव्यवस्थेवर कोणाचाही दबाव नसेल तर उद्या न्याय मिळेल.आणि सविधानाचा, कायद्याचा विजयी होईल.आम्ही आशावादी आहोत.

हे ही वाचा : ठाकरे-शिंदेंच्या लढाईचा उद्या ‘सुप्रीम’ फैसला!

राहूल नार्वेकर कायदेपंडीत

जर कुणी म्हणत (राहुल नार्वेकर) असेल सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत आम्हीच…तर त्यांनी काहीतरी गडबड करण्याचा प्रयत्न केलाय,असा आरोप राऊत यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला. याआधी देखील विधानसभा अध्यक्ष पदावर कायद्याची माहिती असलेली एक व्यक्ती बसली होती. त्याने एक निर्णय दिलाच आहे, हे विसरता कामा नये, असे देखील राऊत म्हणाले.मला अजिबात कायद्याचे ज्ञान नाही ते राहूल नार्वेकर कायदेपंडीत आहेत,अशी टीका देखील राऊत (Sanjay raut)  यांनी केली.

विधानसभा अध्यक्ष जर म्हणत असतील निर्णयाचा अधिकार आपल्याला आहेत. तर ते उद्या सर्वोच्च न्यायालय ठरवेल. पण मला अजूनही खात्री आहे, न्यायालय स्वतंत्र आहे.या देशात लोकशाहीचा न्यायव्यवस्थेचा विजय होईल, असे देखील राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा : ..तर यांची आमदारकी जाणार, CM शिंदेसह ‘ते’ 16 आमदार कोण?

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

मी निकालावर काहीच बोलत नाही आहे. आम्हाला न्याय देवतेवर आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. जर अशी गद्दारी आपल्या महाराष्ट्रात घडलीय ती दुर्लक्ष करत गेलो तर उद्या राजकीय अस्थिरता निर्माण होईल,असे देखील आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले. तसेच राहुल नार्वेकर यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. ते घटनाबाह्य अध्यक्ष बसले आहेत का? असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

‘नाना पाटेकरांची दहशत, दिग्दर्शकांना मारतात’, विवेक अग्निहोत्रींना कोणी भरवली धडकी? नशीब असावं तर असं! बकरी चरायला घेऊन जाणारा क्षणातच बनला कोट्यधीश भारताच्या इतिहासातील 10 सर्वात महान प्रभावी राजे कोणते? तुमच्या घरात फार काळ पैसा का टिकत नाही? भूकंप झाल्यानंतर नेमकी तीव्रता कशी मोजतात, रिश्टर स्केल म्हणजे काय? ‘या’ तारखांना जन्मलेले लोक बुद्धीने असतात हुशार, तुमची जन्म तारीख कोणती? सुंदर ते कोकण! ‘हे’ 10 नयनरम्य समुद्रकिनारे कुटुंबासोबत नक्की करा एक्सप्लोर नेमका काय असतो क्रॅश डाएट, ज्यामुळे गेला श्रीदेवीचा जीव? लाखो रूपयांच्या केशरची घरीच करा शेती, ‘ही’ सोपी पद्धत करा फॉलो! Mumbai मध्ये हँगआउट करण्यासाठी ही 10 ठिकाणं आहेत ‘बेस्ट’! Parineeti Chopra लग्नाच्या लुकवरून ट्रोल, कुणाला केलं कॉपी? टीना दाबीने आनंदाने सांगितली ही गोष्ट… IAS टीना दाबींच्या लेकाचा पहिला फोटो व्हायरल, काकांनी तर केले खूपच लाड! बिग बॉस फेम अभिनेत्रीला कोणी केली मारहाण? ‘तू माझे हृदय आहेस’, IAS रिया दाबीची रोमँटिक पोस्ट! श्रीदेवाची मृ्त्यूचं कारण बोनी कपूरने केलं उघड महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं? Jio vs Airtel: 84 दिवस चालणारा सर्वात स्वस्त प्लान! समजून घ्या… मुस्लिम क्रिकेटर-हिंदू अभिनेत्री, लग्नावेळी मिळाल्या होत्या ठार मारण्याच्या धमक्या! सुवर्ण मंदिरातील ‘त्या’ व्हिडीओमुळे राहुल गांधी पुन्हा चर्चेत…