शिवसेनेनं एका जागेसाठी युती तोडली होती, संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले

मुंबई तक

Sanjay Raut, Chandrashekhar Bawankule, Eknath Shinde : ‘भाजप 240 जागा लढवण्याच्या विचारात आहोत, शिंदेंचे पन्नासच… कारण पन्नासच्या वर त्यांच्याकडे कुणी नाही’, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आणि राजकारण रंगलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बावनकुळेंच्या याच विधानावरून एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांना खडेबोल सुनावलेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर खासदार […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sanjay Raut, Chandrashekhar Bawankule, Eknath Shinde : ‘भाजप 240 जागा लढवण्याच्या विचारात आहोत, शिंदेंचे पन्नासच… कारण पन्नासच्या वर त्यांच्याकडे कुणी नाही’, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आणि राजकारण रंगलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बावनकुळेंच्या याच विधानावरून एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांना खडेबोल सुनावलेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानावर खासदार संजय राऊत म्हणाले, “ही त्यांची लायकी आहे. ज्या शिवसेनेनं एका जागेसाठी युती तोडली होती, 2014 साली. स्वाभिमानासाठी. 40-45 जणांवर तुकडे फेकलेले आहेत. यांना आयुष्यभर तुकडेच फेकले जातील. ते तुकडे तोंडात ठेवूनच चघळत त्यांना जगावं लागेल. त्यांना कुठला स्वाभिमान आहे.”

याच मुद्द्यावर बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, “भाजपचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष यांना सांगतात की, तुम्हाला 40 जागा देऊ, 25 जागा देऊ. उद्या पाच जागा फेकतील यांच्या तोंडावर. ही यांची लायकी आहे. म्हणून भाजप शिवसेना तोडली, ती यासाठीच. त्यांना या महाराष्ट्रातील शिवसेनेचा रुबाब, दरारा हा संपवायचा होता म्हणून शिवसेना तोडली. महाराष्ट्राचा स्वाभिमान तोडायचा होता म्हणून शिवसेना तोडली. सगळे मिंधे लोक त्यांच्या फेकलेल्या तुकड्यांवर जगणार आहेत. खरी शिवसेना कोणती, याचा फैसला जनता करेल.”

शिंदेंच्या शिवसेनेला 48 जागा? जागा वाटपाबद्दल चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

हे वाचलं का?

    follow whatsapp