सेवालाल महाराजांचे वंशज अनिल राठोड ठाकरे गटात : संजय राठोडांना 3 महिन्यात 3 बाजूंनी घेरलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वाशिम :  संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाकरे पक्षात प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनिल राठोड यांच्या हातात शिवबंधन बांधले. यावेळी ठाकरे गटाचे नेते अनंत गिते आणि खासदार अरविंद सावंतही उपस्थित होते. अनिल राठोड यांचा पक्षप्रवेश बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का मानला जात आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. पण शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढली. रोज दिग्गज आणि साधी माणसं शिवसेनेत येत आहेत. वेगवेगळ्या विचारांची माणसं येतं आहेत. त्यामुळे आधी होती त्यापेक्षा शिवसेना अधिक मजबूत होतं आहे. इथे अनंत गिते आणि अरविंद सावंत हे जुने नेते आहेत. ते जुने आणि जाणते आहेत. नुसता जुना शब्द नको. जुनं असून चालत नाही. जाणते हा शब्द हवा. जाणते म्हटल्यावर या परिस्थितीत काय केलं पाहिजे हे त्यांना माहीत असतं. असंही ते म्हणाले.

आजचा अनिल राठोड यांचा पक्षप्रवेश प्रातिनिधीक स्वरुपाचा आहे. आता हे पदाधिकारी राज्यात जातील. वातावरण निर्मितीपेक्षा वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला याच्यापुढे आळा बसेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

संजय राठोडांविरोधात ठाकरेंची फिल्डिंग?

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या संजय राठोड यांना खिंडीत गाठण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केल्याचं चित्र आहे. मागील ३ महिन्यात उद्धव ठाकरेंनी संजय राठोडांशी संबंधित ३ मोठ्या बड्या नेत्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश दिला.

यात सप्टेंबर महिन्यात पोहरादेवी गडावरील महंत सुनील महाराज यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षात प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येनं त्यांच्या समर्थकांनीही हाती शिवबंधन बांधलं. त्यानंतर ठाकरेंनी संजय राठोडांविरुद्ध दुसऱ्या ‘संजय’चा पर्याय समोर आणला. ऑक्टोबर महिन्यात दिग्रसचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनीही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

ADVERTISEMENT

त्यानंतर आता थेट बंजारा समाजात मानाचं स्थान असलेल्या सेवालाल महाराज यांच्या वंशजांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे. यातून संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी चहूबाजूंनी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केल्याचंही चित्र आहे. आता बंजारा समाज नेमका कोणाच्या बाजूने उभं राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT