Viral Video : मंत्र्याला तुरुंगात VIP ट्रिटमेंट? मसाज, बेड, अन् टिव्हीसह इतर सुखसोयी?

मुंबई तक

दिल्ली : केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचा तिहार कारागृहातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांना कारागृहात मसाज, बेड अन् टिव्हीसह इतर सुख-सोयी मिळत असल्याचं दिसून येत आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावरुन जोरदार व्हीआयपी ट्रिटमेंटच्या चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या व्हिडीओवरुन आरोप करताना भाजपचे प्रवक्ते शहजाद […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दिल्ली : केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांचा तिहार कारागृहातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांना कारागृहात मसाज, बेड अन् टिव्हीसह इतर सुख-सोयी मिळत असल्याचं दिसून येत आहेत. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावरुन जोरदार व्हीआयपी ट्रिटमेंटच्या चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

या व्हिडीओवरुन आरोप करताना भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, आप सरकारने तुरुंगाच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. शिक्षेऐवजी सत्येंद्र जैन यांना पूर्ण व्हीव्हीआयपी मजा दिली जात आहे. आता पुरावे पुरेसे असतील का? यासाठीच ठग सुकेशची वसुली झाली होती का? असा सवालही त्यांनी ट्विटरवरुन विचारला आहे. तर खासदार सुब्रत पाठक यांनी यावरुन आम आदमी पक्षाचा खरा चेहरा समोर आला असल्याचं म्हटलं आहे.

दुसऱ्या बाजूला ‘आप’नेही या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे, सत्येंद्र जैन यांना अॅक्युपंक्चर थेरपी दिली जातं असल्याचं आपने म्हटलं आहे. शारीरिक व्याधींमुळे कारागृहात सर्व प्रकारचे उपचार करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे, सत्येंद्र जैन रात्री अनेकदा बायसेप्ससह झोपतात. औषधांसोबतच अॅक्युपंक्चर थेरपीही त्यांच्या उपचाराचा एक भाग आहे. कारागृहात जैन यांची प्रकृती खालावत असल्यांने त्यांच्यावर उपचार करण्याचे आदेश देण्यात आले होते, असंही आपने सांगितलं आहे.

ईडीने कोर्टात केले होते आरोप :

ईडीने तिहार तुरुंगात जैन यांना विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला होता. तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांना डोके मसाज, पायाची मसाज आणि बॅक मसाज यासारख्या सर्व सुविधा दिल्या जात असल्याचा दावा ईडीने केला होता. ईडीने याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावेही न्यायालयाकडे सुपूर्द केले होते.

तिहार तुरुंगात असताना सत्येंद्र जैन कारागृह अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुविधांचा गैरफायदा घेत असल्याचा ईडीचा आरोप होता. यानंतर गृह मंत्रालयाने दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून या प्रकरणी अहवाल मागवला होता. यानंतर 58 जणांची बदली करण्यात आली होती. तर कारागृह नंबर 7 च्या तुरुंग अधिक्षकांना निलंबित करण्यात आलं होतं.

हे वाचलं का?

    follow whatsapp