‘सावरकर म्हणायचे की बलात्कार हे एक…’, ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीचं खळबळजनक वक्तव्य

मुंबई तक

‘सावरकर म्हणायचे की बलात्कार हे एक राजकीय हत्यार आहे’, असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी हे विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

'Savarkar used to say that rape is a political weapon'. said Shivani Wadettiwar
'Savarkar used to say that rape is a political weapon'. said Shivani Wadettiwar
Google CTA

चंद्रपूर: ‘सावरकर म्हणायचे की बलात्कार हे एक राजकीय हत्यार आहे, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा’, असं विधान काँग्रेस नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी केलं आहे. ज्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्यावरून आता त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करत शिवानी यांनी थेट सावरकरांच्या एका पुस्तकातच हे विधान असल्याचा दावा केला आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय हे आपण सविस्तर जाणून घेऊया. (savarkar used to say that rape is a political weapon vijay wadettiwar daughter shivani wadettiwar made a controversial statement)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या काही विधानानंतर राज्यातील भाजप नेत्यांनी राहुल गांधींचा निषेध व्यक्त करत थेट राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढण्यास सुरुवात केली आहे. असं असताना आता याच मुद्द्यावरुन विजय वडेट्टीवारांच्या मुलीने भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. पण यावेळी त्यांनी जे विधान केलं आहे त्यामुळे त्या सध्या चर्चेत आल्या आहेत.

शिवानी वडेट्टीवारांनी नेमकं काय विधान केलं?

‘हे लोकं फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा.. कधीच मोर्चा काढणार नाही. कुठला मोर्चा काढतात तर सावरकर मोर्चा काढतात. सावरकर मोर्चा काढून काय करतात?’

अधिक वाचा- उद्धव ठाकरेंना भाजप पुन्हा एंट्री देणार? अमित शाहांनी विषय केला क्लिअर

‘सावरकर मला तर… मला आणि माझ्यासोबत महिला भगिनी इकडे उपस्थित आहेत. सगळ्यांना भीती वाटत असेल कारण की, सावरकरांचे विचार होते.. काय विचार होते? तर विचार होते की, बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. जे तुम्ही तुमच्या राजकीय विरोधकांच्या विरोधात वापरलं पाहिजे..’