राज्यसभा निवडणूक: फडणवीसांनी दिवसभर एकही प्रतिक्रिया दिली नाही, मध्यरात्री 'डाव' पलटला अन् पहाटे..

राज्यसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर येऊन आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली. पाहा फडणवीस नेमकं काय म्हणाले:
राज्यसभा निवडणूक: फडणवीसांनी दिवसभर एकही प्रतिक्रिया दिली नाही, मध्यरात्री 'डाव' पलटला अन् पहाटे..
see what devendra fadnavis said after victory of rajya sabha election secret of how he got victory revealed(फोटो सौजन्य: Facebook)

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत भाजपने अतिशय अनपेक्षितरित्या आपला तिसरा उमेदवार देखील निवडून आणण्याचा चमत्कार घडवला आहे. महाविकास आघाडीचं पुरेसं संख्याबळ असताना देखील अनेक मतं फोडून भाजपने धनजंय महाडिक यांना राज्यसभेवर निवडून आणलं. तर शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. या सगळ्या विजयाचे खरे शिल्पकार देवेंद्र फडणवीस असल्याचं आता समोर आलं आहे.राज्यसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर येऊन आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली.

खरं तर दोन दिवसांपासून महाविकास आघाडीने दावा केला होता की, त्यांचे चार उमेदवार निवडणूक जिंकून येतील. तर दुसरीकडे भाजपकडून आज दिवसभरात फार कोणी प्रतिक्रिया देत नव्हतं स्वत: फडणवीसांनी दिवसभरात एकही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यानंतर रात्रीत सगळा डाव पलटला अन् भाजपच्या दणदणीत विजयानंतर फडणवीस हे पहाटे-पहाटे मीडियासमोर आले आणि मग ते भरभरुन बोलले.

पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:

'आमच्या सगळ्यांकरिता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की भाजपचे तीनही उमेदवार याठिकाणी निवडून आलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर हा जो विजय आहे हा विजय मी आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित करतो आणि त्याचप्रमाणे आमच्या दुसऱ्या लढवय्या आमदार मुक्ता टिळक यांना समर्पित करतो.'

'लक्ष्मणभाऊ अॅम्ब्युलन्समध्ये बसून एवढ्या लांब प्रवास करुन इकडे आले. मी काल त्यांना फोन करुन त्यांच्या बंधूंना सांगितलं की, आम्हाला लक्ष्मणभाऊ जास्त महत्त्वाचे आहेत सीट आली काय किंवा गेली काय भविष्यात परत जिंकू. पण लक्ष्मण भाऊचा जीव महत्त्वाचा आहे. पण लक्ष्मण भाऊंनी सांगितलं की, काय वाट्टेल ते झालं तरी माझ्या पक्षाकरता मी येणार आहे. त्यामुळे मी त्यांचे खरोखर मनापासून आभार मानतो.' असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या आमदारांचे आभार मानले.

'आजचा विजय सर्वार्थाने महत्त्वाचा विजय आहे. महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला बहुमत दिलं होतं. पण ते बहुमत आमच्या पाठीत खंजीर खुपसून काढून घेण्यात आलं आणि अशाप्रकारचं सरकार हे किती अंतर्विरोधाने भरलं जातं हे आपल्याला आजच्या विजयानंतर पाहायला मिळालेलं आहे.' अशी टीकाच देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर केली.

'सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, आमचे जे तिसरे उमेदवार निवडून आले आहेत त्यांनी शिवसेनेच्या प्रथम उमेदवारापेक्षा म्हणजे संजय राऊतांपेक्षाही जास्त मतं घेतलेली आहेत. आमचे धनंजय महाडिक 41.56 मतं मिळाली जी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त आहे.' अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवर केली.

'सगळ्यात महत्त्वाचं कारण उद्या काय-काय मुजोरी होणार आहे हे माहित असल्याने जे मत बाद झालं शिवसेनेचं ते मत ग्राह्य धरलं असतं तरी आमचा विजय झाला असता. नवाब मलिकांना कोर्टाने परवानगी दिली असती तरीही आमचा विजय झाला असता. त्यामुळे हा आमचा खराखुरा विजय आहे. हा कुठल्याही जोडतोडचा विजय नाही. तर पूर्ण कोटा करुन आम्ही हा विजय मिळवलेला आहे.' असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

'त्यामुळे मी भाजपच्या सर्व आमदारांचं आम्हाला साथ देणाऱ्या सर्व आमदारांचं आणि जे आमच्यासोबत नव्हते. तरीही ज्यांनी आम्हाला मतदान केलं असे अपक्ष आणि छोट्या पक्षाचे जे काही आमदार आहेत अशा सगळ्यांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो आणि हा जो काही विजय आहे हा विजय महाराष्ट्राच्या जनतेला समर्पित करतो आणि पुन्हा एकदा जे स्वत:ला महाराष्ट्र समजतात जे स्वत:लाचा मुंबई समजतात, जे स्वत:लाच मराठी समजतात त्यांना हे लक्षात आणून दिलं की, या विजयाने महाराष्ट्र म्हणजे ते नाहीत. तर महाराष्ट्र म्हणजे 12 कोटी जनता.' अशी टिप्पणी करत देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.

'मला विश्वास आहे की, ही जी काही विजयाची मालिका सुरु झाली आहे. मला कोणालाही या विजयाच्या क्षणी कोणाच्याही बद्दल वाईट बोलायचं नाही. कोणालाही खाली दाखवायचं नाहीए. कोणाचाही उपहास करायचा नाहीए. पण मी एवढंच म्हणेन की, विजयाची मालिका सुरु झाली आहे आणि आता ही मालिका पुढे सुरु राहील.' असा दावा देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला आहे.

see what devendra fadnavis said after victory of rajya sabha election secret of how he got victory revealed
सर्वात मोठी बातमी: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा मोठा उलटफेर, शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव

'मी यावेळी विशेषत: चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढलो. आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं होतं की, त्यांचा वाढदिवस असल्याने आम्ही त्यांना जन्मदिवसाची भेट देऊ. ती भेट दादांना आज प्रत्यक्ष कोल्हापूरचा पेहलवानच या ठिकाणी भेट स्वरुप आम्ही दिलेला आहे.'

'महाविकास आघाडी आमदारांना घोडे समजून घोडेबाजार म्हणत होती हे आमदारांना आवडलं नाही आमदार काही घोडे नाही. त्यामुळे ज्यांना ते लागलं त्यांनी आम्हाला मतदान केलं आणि आम्ही निवडून आलो.' असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी यानिमित्ताने अपक्ष आमदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला.

'पुढचा टप्पा म्हणजे.. आगे आगे देखीए होता है.. क्या.. विधानपरिषदेसाठी आम्ही रणनिती तयार करत आहोत. रणनिती तयार झाली की आम्ही नेमका निर्णय घेऊ.'

'असं आहे की, मविआचा नैतिक पराभव तर आहेच. आम्ही 172 आहोत, 174 आहोत. हे सांगणारे पराभूत झाले आहेत. कारण आम्ही इतकं मतं घेऊन जेव्हा जिंकतो आहोत त्याचा अर्थ हाच आहे की, तिथे समन्वय नाहीए. नाराजी खूप आहे. म्हणजे ओपन मतदान असून ही अवस्था आहे तर ओपन नसतं तर काय अवस्था झाली असती? हे तुम्ही समजू शकता.' असं म्हणत फडणवीसांनी एक प्रकारे महाविकास आघाडीला इशाराच दिला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in