सिंहासन: ‘पत्रकारांबाबत काय वाटतं?’, शरद पवार म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar gave an interesting answer about the journalists in the program of sinhasan film event
sharad pawar gave an interesting answer about the journalists in the program of sinhasan film event
social share
google news

मुंबई: मराठी सिनेसृष्टीत ‘सिंहासन’ (Sinsamhan) सिनेमाने एक अढळ स्थान मिळवलं आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता 44 वर्ष पूर्ण झाले आहेत. 1979 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. याच निमित्ताने मुंबईत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यासाठी सिंहासन सिनेमाचे दिग्दर्शक जब्बार पटेल आणि अभिनेते नाना पाटेकर, मोहन आगाशे हे उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे हे देखील हजर होते. या सगळ्यांनी या सिनेमाच्या अनेक आठवणी जागवल्या आहेत. पण यावेळी शरद पवारांनी पत्रकारांबाबतच्या प्रश्नावर एक उत्तर दिलं आहे. जे फारच रंजक आहे. (sharad pawar gave an interesting answer about the journalists in the program of sinhasan film event)

सिंहासन सिनेमा हा दिवंगत लेखक अरूण साधू यांच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या दोन कादंबऱ्यांवर बेतलेला आहे. राजकीय नाट्य असलेल्या या सिनेमात दिगू टिपणीस हा पत्रकार मध्यवर्ती भूमिकेत आहेत. हा सिनेमा राजकीय नेत्यांमधील क्रूर राजकारणावर बेतलेला असला तरीही संपूर्ण सिनेमा हा निळू फुलेंनी साकारलेला दिगू टिपणीसभोवतीच फिरत राहता. या सिनेमातील पत्रकाराची भूमिका ही निळू फुलेंनी अतिशय चपखलपणे वठवली होती. यामुळेच 44 वर्षानंतरही या सिनेमाची मोहिनी आजही कायम आहे.

अधिक वाचा- NCP : शरद पवारांना आयोगाने का दिला धक्का? राष्ट्रवादीचा ‘राष्ट्रीय दर्जा’ जाण्यामागची ‘ही’ आहेत कारण

याच सिनेमाला 44 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र आणि एबीपी माझा वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह जब्बार पटेल, मोहन आगाशे आणि नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी शरद पवार यांना जेव्हा पत्रकारांबाबत विचारलं तेव्हा त्यांनी मिश्किलपणे विचारलं. पाहा यावेळी पवार नेमकं काय म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पत्रकारांबाबत शरद पवारांना काय वाटतं?

प्रश्न: सिंहासन सिनेमात ज्या प्रमुख भूमिका आहेत मग ते अरूण सरनाईक असेल, दत्ता भट असतील, श्रीराम लागू, निळू फुले.. तुम्हाला सगळ्यात जास्त कणव कुणाबद्दल वाटली?

शरद पवार: निळू फुले.. पत्रकाराची भूमिका..

ADVERTISEMENT

प्रश्न: आजही तशीच भावना आहे पत्रकारांबद्दल कणवेची?

ADVERTISEMENT

शरद पवार: नाही.. त्यांच्याबद्दलची आहे..

प्रश्न: ही जी तीन प्रमुख पात्रं आहेत… म्हणजे मुख्यमंत्री, अर्थमंत्री, कृषीमंत्री.. तर या तीन पात्रांबाबत तुम्हाला काय वाटला..

शरद पवार: सिनेमातील मुख्यमंत्री कमी बोलणारे आणि जे काही असेल करायचं त्यात कधी गडबड न करणारे.. म्हणजे अतिशय सॉफ्ट ऑपरेशन कसं करावं.. याचं वैशिष्ट्य म्हणून ज्यांची ओळख होती तशाच प्रकारचं मुख्यमंत्र्यांचं पात्र हुबेहूब या सिनेमात होतं. आणि ते म्हणजे वसंतराव नाईक. असं शरद पवार यावेळी म्हणाले.

अधिक वाचा- राष्ट्रवादीला मोठा धक्का; निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

दरम्यान, या सिनेमाबाबत अनेक आठवणींना दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी उजाळा दिला आहे. सिनेमासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी कशाप्रकारे सहाय्य केलं.. तसेच तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांनी सिनेमा करताना कसा सल्ला दिला होता या अनेक गोष्टीही यावेळी पटेलांनी सांगितल्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT