Raut vs Rane: ‘सोड रे चुXX तो’, राऊतांनी पुन्हा वापरले राणेंना अपशब्द

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Sanjay Raut used abusive words against Union Minister Narayan Rane: मुंबई: शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यामधील तू-तू-मै-मै गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यातही नारायण राणेंनी काल (15 जानेवारी) मुंबईतील भांडुपमध्ये एका जाहीर कार्यक्रमात संजय राऊतांवर जोरदार टीका केली होती. त्याचबाबत आज (16 जानेवारी) संजय राऊत यांना जेव्हा पत्रकारांनी विचारणा करण्यात आली तेव्हा संजय राऊतांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत राणेंना उद्देशून अपशब्द वापरले. (shiv sena leader sanjay raut once again used abusive words about bjp minister narayan rane)

पाहा संजय राऊत राणेंना नेमकं काय म्हणाले:

पत्रकार: काल नारायण राणे भांडुपमध्ये होते. त्यांनी तुमच्यावर आरोप केले…

संजय राऊत: सोड रे चुXX तो..

असे अपशब्द वापरत संजय राऊत यांनी नारायण राणेंनी केलेल्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

राणे-राऊतांमध्ये ज्यामुळे ठिणगी पडलीये, ‘त्या’ अग्रलेखात काय?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, याआधी संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना कॅमेऱ्यासमोर अपशब्द वापरले होते. ज्यानंतर भाजपने त्यांच्यावर बरीच टीका केली होती. असं असताना आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी राणेंबाबत अपशब्द वापरले आहेत. यामुळे आता नारायण यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘दाव्होसला जाण्यापेक्षा गुजरातला जा’

दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या दाव्होस दौऱ्यावरुन देखील टीका केली आहे.

ADVERTISEMENT

‘दाव्होसमधून काय येतं ते आम्हाला ठावूक नाही. पण तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळवून नेले ते आधी आणा. 2 लाख कोटींच्या वरची गुंतवणूक तुमच्या नाकासमोरून गुजरात आणि इतर राज्य घेऊन गेलं. ती आधी घेऊन आलात तर तुमच्या दाव्होसच्या जाण्याला अर्थ आहे. दाव्होसमधील करार कसे होतात हे आम्हाला माहिती आहे.’

ADVERTISEMENT

‘जगभरातील येतात तिकडे राज्यकर्ते.. मग तुम्ही सांगतात पाच लाख कोटींचे करार झाले. आतापर्यंत दाव्होसला जाऊन किती करार केले आणि राज्यात किती उद्योग आले हे कोणी सिद्ध करू शकलेलं नाही. पण आम्हाला डोळ्यासमोर दिसतंय अनेक प्रकल्प जे महाराष्ट्रात आले होते ते तुमच्या डोळ्यासमोरून खेचून नेले कुणीतरी. दाव्होसला जाण्यापेक्षा गुजरातला जा.’ असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न केला.

मी उद्धव ठाकरेंना भेटणार, त्यानंतर ते राऊतला चपलेने मारतील: राणे

‘मुंबईत उत्तर प्रदेशप्रमाणे गंगेत मृतदेह तरंगले नाहीत’

‘तुमच्या हातात सत्ता आहे केंद्रीय तपास यंत्रणा आहे. तुम्ही खोटी प्रकरणं निर्माण करायची, बदनामी करायची.. मुंबईत किंवा महाराष्ट्रात उत्तर प्रदेशप्रमाणे गंगेत मृतदेह तरंगले नाहीत. कोरोनाग्रस्तांचे.. प्रत्येकाला आम्ही उपचार देऊ शकलो. प्राण वाचवले अनेकांचे.. हे उद्धव ठाकरे यांचं यश आहे. हे त्यांनी त्या-त्या वेळेला घेतलेले निर्णय. स्वत: उद्धव ठाकरे, महापालिका प्रशासन या सगळ्यांचं टीम वर्क होतं. त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी केलं. नाही तर मुंबईच्या मिठी नदीत देखील तुम्हाला प्रेतं दिसली असती.’

‘त्या कायद्यानुसार तातडीने निर्णय घेणं गरजेचं होतं आणि तसे निर्णय घेतले गेले. मी खात्रीने सांगतो अत्यंत पारदर्शक व्यवहार होते. त्या काळात गुजरातमध्ये स्मशानात जागा मिळत नव्हत्या. तर उत्तरप्रदेशमधल्या नद्यांमधून, गंगेतून लाखो प्रेतं वाहताना जगानं पाहिलं. सुदैव आहे की, भाजपने आणि त्यांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले पाहिजे. त्यांनी ज्या पद्धतीने नेतृत्व केलं म्हणून महाराष्ट्रच्या जनतेचे प्राण वाचले.’ असं म्हणत संजय राऊतांनी मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातील कामाबाबत पाठराखणच केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT