Shiv Sena : 7 लोकांमुळे शिंदेंचा गेम फसणार? ठाकरे गटाचा आक्षेप काय?

shiv sena symbol election commission hearing : शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा करण्यात आलाय... निवडणूक आयोगात सुनावणी सुरू असताना ठाकरे गटाने 7 जिल्हाप्रमुखांवरून शिंदेंना खिंडीत गाठलं...
shiv sena symbol fight : why thackeray faction objects on shinde faction district chief
shiv sena symbol fight : why thackeray faction objects on shinde faction district chief

Shiv Sena hearing in Election commission : उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दोन्ही नेते सध्या शिवसेनेवर (Shiv Sena) कब्जा मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई लढताहेत. शिवसेनेच्या चिन्हाच्या वादावर सध्या केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election commission of india) सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाच्या (Thackeray Faction) वकिलांनी शिंदे गटाकडून (Shinde Faction) दाखवण्यात आलेल्या 7 जिल्हाप्रमुखांचा मुद्दा उपस्थित केला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 7 जिल्हाप्रमुखांबद्दल नेमकी तक्रार काय आहे?

खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी आहे. मंगळवारी झालेल्या (17 जानेवारी) सुनावणी वेळी ठाकरे गटाने शिंदे गटाकडून दाखवण्यात आलेल्या 7 जिल्हाप्रमुखांच्या मुद्द्यावर आक्षेप घेतला.

शिंदे गटाचे सात जिल्हाप्रमुख शिवसेनेचं (UBT) नेमका आक्षेप काय?

यासंदर्भात शिवसेनेचे (UBT) खासदार अरविंद सावंत यांच्याशी मुंबई Takने संवाद साधला असता. ते म्हणाले, "त्यांनी (शिंदे गटाने) निवडणूक आयोगात असं सांगितलं की, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमच्याकडे आले. त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून कधीच दूर केलेलं आहे."

shiv sena symbol fight : why thackeray faction objects on shinde faction district chief
मंत्रिमंडळ विस्तार होणार! इच्छुकांची गर्दी, कुणाची लागणार वर्णी?

पुढे बोलताना खासदार सावंत असंही म्हणाले की, "ते जे सांगताहेत की, खासदार आमच्याकडे आले, आमदार आमच्याकडे आले. तसंच त्यांनी शिवसेनेचे पदाधिकारी पण आमच्याकडे आले असं सांगितलं. म्हणजे पदावर नव्हते त्यांची नावंही पदाधिकारी म्हणून दाखवली."

पदावर नसलेल्यांना जिल्हाप्रमुख दाखवलंय -अरविद सावंत

"हे लोक जेव्हा 21 जून 2022 रोजी फुटले. त्याच्या अगोदर या सातही जणांना पदावरून दूर करण्यात आलेलं होतं. म्हणून त्यावर आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगात सांगितलं की ही माणसं पदावर नव्हती. तुम्ही जिल्हाप्रमुख म्हणून दाखवता", असं अरविंद सावंत म्हणाले.

shiv sena symbol fight : why thackeray faction objects on shinde faction district chief
Shiv Sena : तर धनुष्यबाण कायमचा... उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य
"त्यांचं काय झालंय की लोकप्रतिनिधी म्हणून फूट दाखवलीये, पण पक्षाच्या कार्यकारिणीतील फूट काय? नेते किती आले? कोण किती आले? आता ते (एकनाथ शिंदे) स्वतः नेते होते. आता गजानन कीर्तीकर एक नेते त्यांच्याकडे गेले. आडसूळ एक नेते होते. रामदास कदम नेते होते. तर ते सांगू शकतात की हे चार नेते आलेत, पण बाकीच्यांचं कसं सांगू शकतात", असं म्हणत सावंतांनी 7 जिल्हाप्रमुखांबद्दलच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

"ते नेते कधी गेले आता. गजानन कीर्तिकर तर कोर्टात आणि निवडणूक आयोगात केस दाखल झाल्यानंतर गेले. हे सात लोक पूर्वी केव्हातरी जिल्हाप्रमुख होते. जेव्हा ते शिंदे गटात गेले, तेव्हा ते जिल्हाप्रमुख नव्हते. आम्ही त्यांना आधीच दूर केलं होतं. ते तिकडे गेल्यानंतर ते जिल्हाप्रमुख झाले. त्यांनी शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख आले, असं कसं दाखवता? कार्यकारिणीतील फूट दाखवण्यासाठी ते असं करताहेत", असंही खासदार अरविंद सावंत मुंबई Takशी बोलताना सांगितलं.

ठाकरे गटाने आक्षेप घेतलेले शिंदे गटातील जिल्हाप्रमुख कोण?

राजाभाई केणी, राम चंद्रकांत रघुवंशी, किरसिंग वसावे, नितीन मते, दत्तात्रय साळुंके, सुरज साळुंखे यांच्यासह आणखी जिल्हाप्रमुखांचा समावेश आहे. त्यामुळेच ठाकरे गटाने पदाधिकाऱ्यांची ओळख परेड करण्याची मागणीही आयोगाकडे केलीये.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in