‘शिवसेना आता संपण्याच्या वाटेवरच’;भाजपाध्यक्ष जेपी नड्डा कार्यकर्त्यांसमोर काय बोलले?
शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटातील नेत्यांकडून होत असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठं विधान केलं आहे. जम्मू कश्मीर ते केरळातील प्रादेशिक पक्षांची नावं घेत नड्डा यांनी कार्यकर्त्यांसमोर भाजपचे इरादे स्पष्ट केले. बिहारमध्ये जिल्हा पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात जेपी नड्डा बोलत होते. यावेळी त्यांनी राजकारणातील घराणेशाहीवर हल्ला […]
ADVERTISEMENT

शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटातील नेत्यांकडून होत असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठं विधान केलं आहे. जम्मू कश्मीर ते केरळातील प्रादेशिक पक्षांची नावं घेत नड्डा यांनी कार्यकर्त्यांसमोर भाजपचे इरादे स्पष्ट केले.
बिहारमध्ये जिल्हा पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात जेपी नड्डा बोलत होते. यावेळी त्यांनी राजकारणातील घराणेशाहीवर हल्ला चढवला. “पक्ष कार्यालयाचा वापर रणनीती ठरवण्यासाठी केला पाहिजे. नियोजन करण्यासाठी केला पाहिजे. भाजप हा एकमेव असा पक्ष आहे जो विचारधारेवर चालतोय. वैचारिक पायावर आपण उभे आहोत. मी हे वारंवार सांगतो की, जर हा विचार नसता तर आपण इतकी मोठी लढाई लढू शकलो नसतो”,असं जेपी नड्डा म्हणाले.
“सगळे लोक संपले आहेत. मिटले आहेत. जे नाही संपले, ते संपून जातील. फक्त भाजप राहिल. एका विचारामुळे आपण लढत आहोत. विचारांमुळे जोडले गेलेलो आहोत. कार्यकर्त्यांचा बेस बनतो तो पक्ष कार्यालयात.”
“मला अनेकजण सांगतात काँग्रेस पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी. मी म्हणालो प्रयत्न करून बघा. दोन दिवसांत कार्यकर्ता तयार होत नाही. आमच्याप्रमाणे ४० वर्ष तपश्चर्या करावी लागेल, तेव्हा उभे राहतील. संस्कारातून हे आलेलं आहे”, असं नड्डांनी सांगितलं.