खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय, न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास : उद्धव ठाकरे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : शिवाजी पार्कवर यावर्षी शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुंबई महानगरपालिकेचा दोन्ही गटांना मैदान न देण्याचा निर्णय रद्द करुन उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली. यावेळी न्यायालयाने शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेली हस्तक्षेप याचिकाही फेटाळून लावण्यात आली. दरम्यान आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे, असे म्हणतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाचा या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली.

उत्साहात या, गुलाल उधळतं या, पण शिस्तीत या….

उद्धव ठाकरे यांंनी यावेळी पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मेळाव्याला येताना उत्साहात या, गुलाल उधळतं या, पण शिस्तीत या. कुठेही परंपरेला गालबोट लागून देवू नका. आपण आपल्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करत आहोत, असे म्हणतं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्धभवणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच राज्य सरकारवर कायदा आणि सुव्यस्थेची जबाबदारी आहे, ते ती पाळतील अशी अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना ठाकरे यांनी न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय झाला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात आता खटला प्रलंबित आहे, त्यावरील निकाल हा शिवसेनेचे भवितव्य ठरविणारा नाही, तर देशाच्या लोकशाहीचे भवितव्य आणि भविष्य ठरविणारा आहे. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. पण सर्वोच्च न्यायालयात काय होईल त्यावर मी आता बोलणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ठाकरे गटाला दसरा मेळाव्याची परवानगी :

मुंबई महापालिकेनं शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यास परवानगी नाकारल्यानंतर ठाकरे गटाकडून हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शिवसेनेनं महापालिकेच्या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या याचिकेला विरोध करणारी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. त्यानंतर आज शिवसेना, शिंदे गट आणि मुंबई महापालिका अशा तिन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत कोर्टाने ठाकरे गटाला परवानगी दिली

    follow whatsapp

    ADVERTISEMENT