“..तर तुम्ही उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका केली असती”, असं शिवसेनेने फडणवीसांना का सुनावलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सुफी संत बाबा ताजुद्दीन यांच्या 100 व्या ऊरूसनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शुभेच्छावरून मोठी चर्चा होताना दिसत आहे. शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी यावरून देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. फडणवीस यांचा शुभेच्छांचा व्हिडीओ पोस्ट करत “हेच जर उद्धव ठाकरेंनी केलं असतं, तर यांनी हिंदुत्व सोडलं, असा अपप्रचार केला असता”, असे ट्वीट मनिषा कायंदे यांनी केलं आहे.

मनीषा कायंदे यांनी फडणवीसांना लगावला खोचक टोला

देवेंद्र फडणवीस यांनी सुफी संत बाबा ताजुद्दीन यांच्या 100 व्या उरूस वर्षानिमित्त एक शुभेच्छांचा व्हिडिओ पोस्ट केला होता. यावरून शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. अशा शुभेच्छा उद्धव ठाकरे यांनी दिल्या असत्या तर भाजपने किती अपप्रचार केला असता, असं त्या म्हणाल्या. त्यामुळे फडणवीसांनी दिलेल्या शुभेच्छा आता चर्चेचा विषय ठरत आहे. यावर भाजपकडून काय प्रत्युत्तर येतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिवसेनेचं भाजपवर पलटवार

यापूर्वी इफ्तार पार्टी, उर्दूत बॅनर, अजान स्पर्धा आणि उद्धव ठाकरे यांच्या नावापुढे जनाब लिहलं गेल्याने भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला होता. हेच बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. शिवसेनेने बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं आहे, अशी घणाघाती टीका देखील उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेल्यापासून करतात. त्यानंतर आता शिवसेनेकडून भाजपवर पलटवार सुरु आहे. सुफी संतांच्या ऊरुसानिमित्त दिलेल्या शुभेच्छावरून फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

यंदा जगभरातून लाखो भाविक येण्याची शक्यता

ADVERTISEMENT

सूफी संत बाबा ताजुद्दीन यांचा १०० वा वार्षिक उरुस २१ ऑगस्ट ते ३ नोव्हेंबर साजरा होणार आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात ताजुद्दीन बाबा यांचा ऊरूस साजरा केला जातो. ताजुद्दीन बाबा यांचे सर्व धर्मातील लोक भाविक आहेत. त्यामुळे त्यांच्या ऊरुसला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. यावर्षीही जगभरातून लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या निर्बंधामुळे उरूस होऊ शकला नव्हता. महत्त्वाचं म्हणजे यंदा शताब्दी वर्ष असल्याने तसेच दोन वर्षांनंतर शाही संदल निघत असल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT