कैलास पाटील यांच्या उपोषणाला वाढता पाठिंबा; 7 शेतकऱ्यांचे जमिनीत गाडून घेत आंदोलन
उस्मानाबाद : जिल्ह्यातील सारोळा गावातील सात शेतकऱ्यांनी जमिनीत खड्डे काढून स्वतःला गाडून घेतले आहे. सर्वोच्च न्यायायलयाच्या आदेशांप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा, अतिवृष्टी व नुकसान भरपाईचे पैसे मिळावे यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाचा आज चौथा दिवस असून आमदार पाटील यांना पाठिंबा म्हणून शेतकऱ्यांनी ही […]
ADVERTISEMENT

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सारोळा गावातील सात शेतकऱ्यांनी जमिनीत खड्डे काढून स्वतःला गाडून घेतले आहे. सर्वोच्च न्यायायलयाच्या आदेशांप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा, अतिवृष्टी व नुकसान भरपाईचे पैसे मिळावे यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत.
या उपोषणाचा आज चौथा दिवस असून आमदार पाटील यांना पाठिंबा म्हणून शेतकऱ्यांनी ही कृती केली आहे. शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याने त्यांना दिवाळी साजरी करता आली नाही. त्यामुळे जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
याशिवाय या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज NH 52 वरील आळणी फाटा चौक येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी बांधवांनी हजारोच्या संख्येने सहभागी होऊन रस्तारोको आंदोलन केले.
सुषमा अंधारेंचा कैलास पाटील यांना पाठिंबा :
दरम्यान, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी रात्री आमदार कैलास पाटील यांची भेट घेतली. .यावेळी सुषमा अंधारे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, शेतकऱ्यांना पीक विमा आणि अनुदानाचे पैसे मिळावे या मागणीसाठी आमदार कैलास पाटील उपोषण करत आहेत आणि दिवाळी सणात आमरण उपोषण करावे लागते आहे हे क्लेशदायक आहे. बहीण म्हणून त्यांची पाठराखण करणे करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. हा लढा राज्यातील शेतकऱ्यांचा आहे.