आमदार संजय शिरसाट अजूनही आयसीयुमध्येच; तब्येतीबाबत काय म्हणाले डॉक्टर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अर्थात शिंदे गटाचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असून सध्या त्यांना आयसीयूमध्येच ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टर जलील पारकर यांनी दिली.

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना आज एअर अँब्युलन्सने औरंगाबादहून मुंबईला आणण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. सोमवारी दुपारी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील सिग्मा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याच रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईत आणण्यात आलं आहे.

संजय शिसराट यांच्यावर अँजिओप्लास्टी :

दरम्यान, डॉ. जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला आणल्यानंतर शिरसाट यांच्या काही बेसिक टेस्ट करण्यात आल्या. त्यांची अॅंजिओग्राफीही करण्यात आली. यात एक ब्लॉक निघाला. त्यानंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यामुळे आता साधारण 5 दिवस त्यांना रुग्णालयात थांबावं लागणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

खबरदारी म्हणून सध्या शिरसाट यांना आयसीयूमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांना रुग्णालयात अॅडमिट केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोन केला होता. त्यांनी शिरसाट यांच्या तब्येतीची माहिती घेतली आणि भेटायला येतो असं सांगितलं आहे. आता नेमकं कधी ते वेळ कळवतील, असंही डॉक्टर पारकर म्हणाले.

संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा यांनी काय सांगितलं?

“संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तशी लक्षणं दिसत होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना औरंगाबादहून मुंबईत आणण्यात आलं आहे. संजय शिरसाट यांचं ब्लड प्रेशर वाढलं होतं. त्यामुळे त्यांना औरंगाबादच्या युनायटेड सिग्मा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची आधीची अँजिओप्लास्टी मुंबईत झाली आहे. त्यामुळे पुढील उपचारांसाठी मुंबईत आणण्यात आलं आहे” असंही हर्षदा यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

कोण आहेत संजय शिरसाट?

संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला सर्वात आधी पाठिंबा दिला त्यापैकी एक शिरसाट होते. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद दिलं जाईल अशाही चर्चा होत्या. मात्र मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आलं नाही. २००९, २०१४ आणि २०१९ अशा सलग तीन टर्ममध्ये शिरसाट औरंगाबाद पश्चिममधून विजयी झाले आहेत.

ADVERTISEMENT

राजकारणात येण्यापूर्वी संजय शिरसाट रिक्षाचालक होते. पुढे 1985 साली शिवसेनेतून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २००० साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. २००३ मध्ये त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली होती. 2005 मध्ये ते पुन्हा नगरसेवक बनले होते. त्यानंतर 2009 साली पहिल्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT