Shiv Sena : ७ जिल्हाप्रमुख शिंदेंना अडचणीत आणणार? आयोगात दोन्ही गट भिडले!
shivsena symbol thackeray group objects to shinde group 7 district chief अकोला : शिवसेना कोणाची? या प्रश्नावर सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात मंथन सुरु आहे. या प्रकरणातील दुसरी सुनावणी मंगळवारी (१७ जानेवारी) पार पडली. १० जानेवारीच्या सुनावणीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने युक्तीवाद केला होता. तर आजच्या सुनावणीत शिवसेना (UBT) गटाने युक्तीवाद केला. यानंतर आता याप्रकरणातील पुढची सुनावणी २० […]
ADVERTISEMENT

shivsena symbol thackeray group objects to shinde group 7 district chief
अकोला : शिवसेना कोणाची? या प्रश्नावर सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात मंथन सुरु आहे. या प्रकरणातील दुसरी सुनावणी मंगळवारी (१७ जानेवारी) पार पडली. १० जानेवारीच्या सुनावणीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने युक्तीवाद केला होता. तर आजच्या सुनावणीत शिवसेना (UBT) गटाने युक्तीवाद केला. यानंतर आता याप्रकरणातील पुढची सुनावणी २० जानेवारीला होणार आहे. (shivsena party symbol election commission hearing thackeray group objects to shinde group 7 district chief)
आजच्या सुनावणीत काय काय घडलं?
आजच्या सुनावणीत शिंदे-ठाकरे गटाने एकमेकांचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाच्या वतीने अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. तर शिंदे गटाच्या वतीने अॅड. महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली. यावेळी ठाकरे गटाच्यावतीने शिंदे गटाच्या ७ जिल्हाप्रमुखांवर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे हे ७ जिल्हाप्रमुख शिंदेंना अडचणीत आणणार का? असा सवाल विचारला जात आहे.
कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद :
-
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत प्रतिक्षा करा