Chinchwad Election : राहुल कलाटेंना पुन्हा पक्षात घेणार? ठाकरेंचे संकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Uddhav Thackeray on rahul Kalete :

मुंबई : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Assembly) बंडखोरी करुन निकालात ट्विस्ट आणलेले राहुल कलाटे (Rahul Kalate) यांना पुन्हा पक्षात घेणार असल्याचे संकेत शिवसेना (UBT) चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. ते आज (गुरुवारी) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या निवडणुकीत बंडखोरी करु नये असे स्वतः ठाकरे यांनी सांगूनही कलाटे यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली होती. मात्र आता ठाकरे यांनीच कलाटे यांना सोबत घेण्याबाबत सुतोवाच केलं आहे. (Chinchwad Assembly Election | Uddhav Thackeray on rahul Kalete)

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, कसब्यामध्ये पोटनिवडणूक जिंकल्याचा आनंद आहे. मतदारसंघातील मतदारांनी प्रभावाबाहेर येऊन वेगळा विचार केला हे कौतुकास्पद आहे. देशही या प्रभावाबाहेर येईल. टिळकांच्या घराण्याबाबत ‘वापरा आणि फेकून द्या’ ही रणनीती अवलंबण्यात आली. बापट यांना आजारी असतानाही प्रचाराला आणलं, या गोष्टी मतदारांना रुचल्या नाहीत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तर चिंचवडमध्येसंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपविरोधीतील मतांची बेरीज वाढत आहे. काटे आणि कलाटे या दोन्ही उमेदवारांना मिळणाऱ्या मतांची बेरीज केल्यास मतदार जागृक होत आहेत. आता हे आमच्यावर आहे की एकत्र राहणं आणि मतांची बेरीज करणं. यामुळे भाजपचा पराभव शक्य आहे, असं म्हणतं ठाकरे यांनी कलाटे यांना पक्षात घेण्याबाबत संकेत दिले.

Kasba Peth election Results: मतदारांचा भाजपला दणका, धंगेकर, रासनेंना किती मतं मिळाली?

ADVERTISEMENT

संजय राऊत दौऱ्यावर, आल्यावर चर्चा करणार :

संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग प्रस्तावावर बोलताना ठाकरे म्हणाले, ते दौऱ्यावर आहेत, पण ते नेमक काय बोलले हे त्यांच्याशी बोलावं लागेल. ते आल्यानंतर मी त्यांच्याशी बोलेणं आणि माझं मत सांगेणं. पण संजय राऊतांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आधी देशद्रोही कोणाला बोलले होते याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे, असं ठाकरे म्हणाले.

ADVERTISEMENT

Chinchwad Bypoll results 2023 Live Update: चिंचवडमध्ये भाजपला दिलासा, जगतापांना मोठी आघाडी

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्यासाठी नवा अंकुर :

सर्वोच्य न्यायालयाने निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. या निकालाबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल लोकशाही जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने दिलासादायक आहे. आपल्या देशात लोकशाही जिवंत ठेवायची असल्यास पक्षांतर्गत लोकशाही जिवंत आहे हे बघणारा, निवडणूक आयोग पाहिजे. नव्यानं झालेल्या बदलाचं स्वागतं आहे, बेबंदशाहीला वेळीच रोखलं नाही तर हुकूमशाही सोकावेल. पण आज आमच्या आशेला अंकुर फुटला, असं ठाकरे म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT