Shivsena : भावना गवळींचे घटस्फोटित पती कॅप्टन प्रशांत सुर्वे उद्धव ठाकरेंसोबत

मुंबई तक

उद्धव ठाकरेंना २१ जूनला जो झटका मिळाला त्यात पडझड होतेच आहेत. खासदार भावना गवळी या शिंदे गटात गेल्या आहेत. त्यांच्यासोबत १२ खासदारही गेले आहेत. अशात भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे पती कॅप्टन प्रशांत सुर्वे शिवसेनेत गेले आहेत. प्रशांत सुर्वे आणि भावना गवळी यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र आता प्रशांत सुर्वे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

उद्धव ठाकरेंना २१ जूनला जो झटका मिळाला त्यात पडझड होतेच आहेत. खासदार भावना गवळी या शिंदे गटात गेल्या आहेत. त्यांच्यासोबत १२ खासदारही गेले आहेत. अशात भावना गवळी यांचे पूर्वाश्रमीचे पती कॅप्टन प्रशांत सुर्वे शिवसेनेत गेले आहेत. प्रशांत सुर्वे आणि भावना गवळी यांचा घटस्फोट झाला आहे. मात्र आता प्रशांत सुर्वे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

प्रशांत सुर्वे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यावर काय म्हटलंय?

२०१४ मध्येच मी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी मी उद्धव ठाकरेंना भेटलो होते. पण तेव्हा परिस्थिती तशी नाही असं उद्धव ठाकरेंचं मत होतं. त्यावेळी मला पक्षाकडून काही जबाबदारी देण्यात आली नव्हती. त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.

ईडीमुळे चर्चेत आलेल्या भावना गवळी आल्या समोर, शिंदे गटाच्या प्रतोदपदी नियुक्ती

खासदार भावना गवळी आणि प्रशांत सुर्वे यांचा २०१३ मध्ये घटस्फोट झाला आहे. भावना गवळी विभक्त झाल्यानंतर प्रशांत सुर्वे यांनी २०१४ मध्ये त्यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवली होती. प्रशांत सुर्वे हे मुळचे वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. आता प्रशांत सुर्वे हे शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे भावना गवळीच्या विरोधात त्यांना उभं केलं जाण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp