ईडीमुळे चर्चेत आलेल्या भावना गवळी आल्या समोर, शिंदे गटाच्या प्रतोदपदी नियुक्ती
उद्धव ठाकरे यांना आणखी एका मोठ्या बंडाला सामोरं जावं लागत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पासून फुटून आमदारांनी बंड केलं. आता खासदारांचा देखील एक गट एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय. आज शिवसेनेच्या 10 पेक्षा जास्त खासदारांनी एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. ज्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून ईडीच्या […]
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांना आणखी एका मोठ्या बंडाला सामोरं जावं लागत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पासून फुटून आमदारांनी बंड केलं. आता खासदारांचा देखील एक गट एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जातोय. आज शिवसेनेच्या 10 पेक्षा जास्त खासदारांनी एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. ज्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर असलेल्या भावना गवळी यांचा देखील समावेश होता.
एकनाथ शिंदे गटाने काही जणांची कार्यकारिणी जाहीर केली. भावना गवळी यांची लोकसभेतील प्रतोदपदी नियुक्ती कायम ठेवली.
भावना गवळींचं एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा
काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या जवळ असलेल्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची हक्कलपट्टी उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात येत होती. यामध्ये भावना गवळी यांच्या समर्थकांचा देखील समावेश होता. त्यामुळे आतापर्यंत उघड शिंदे यांचं समर्थन न करणाऱ्या भावना गवळी समोर आल्या ते थेट शिंदे यांच्यासोबतच.
त्यांच्यासह इतर खासदार देखील शिंदे यांच्यासोबत दिसतायेत. त्यामुळे लोकसभेतील सदस्य गटात देखील उद्धव ठाकरे यांच्यासमोर कायदेशीरपेच निर्माण होऊ शकतो.