शेतकऱ्यांच्या बांधावर आदित्य ठाकरेंचा दौरा, अंबादास दानवेही नाशिक दौऱ्यावर

नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट आदित्य ठाकरे घेणार
 Aditya Thackeray and Opposition Leader Ambadas Danve on Nashik and Pune Farmer Visit
Aditya Thackeray and Opposition Leader Ambadas Danve on Nashik and Pune Farmer Visit

उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ आता आदित्य ठाकरे यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची दुःखं जाणून घ्यायचं ठरवलं आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकताच औरंगाबादचा दौरा केला. आता आज आदित्य ठाकरे नाशिक दौरा करत आहेत. त्यांच्यासोबत अंबादास दानवेही आहेत.

आज दुपारी १२ वाजता आदित्य ठाकरे नाशिकच्या सिन्नर तालुक्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतील. त्यानंतर वडगाव आळेफाटा या ठिकाणी जातील. तरस शिरूर वाघाळे या पुणे जिल्ह्यातल्या गावांनाही ते भेट देणार आहेत.

नाशिक दौऱ्यावर जाण्याआधी काय म्हणाले आदित्य ठाकरे?

राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता. आज आम्ही शेतकऱ्यांना धीर द्यायला जात आहोत. सरकार किती घटनाबाह्य असलं तरीही सरकारी यंत्रणेकडून मदत ही लगेच झाली पाहिजे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी करणारं आमचं सरकार होतं. आता विरोधी पक्षात असलो तरी आमची जबाबदारी म्हणून आम्ही जात आहोत."

शेतकऱ्यांसोबत उभं राहणं गरजेचं आहे

पुढे बोलताना ते म्हणाले की, "शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या बांधावर उभे राहणार आहोत. शेतकऱ्यांसोबत उभं राहणं हे गरजेचे आहे. दहीहंडी असो वा शिधा वाटपाबाबत घोषणा आणि तारखा फक्त पाहायला मिळतात. कृषीमंत्री आणि इतर मंत्र्यांनी शेतकऱ्यांना जाऊन भेट देणे गरजेचे आहे. राजकारण दूर ठेवा आणि मदत करा असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

बॅनर्सवरूनही आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदे सरकारवर टीका

या सरकारला घोषणाबाजी सरकार, खोके सरकार अशी नावं मिळाली आहेत. पण यांना कोणतीही लाज वाटत नाही. आपण काम करणं गरजेचं आहे हे देखील हे सरकार विसरून गेलं आहे. राज्यातल्या प्रत्येक बस स्थानकावर शिंदे सरकारचे होर्डिंग्ज लागले आहत. या होर्डिंगसाठी पैसे कुठून आले? कुणी दिले? दिले नसतील तर नुकसान भरपाई कोण करणार? हे सरकार अनेक ठिकाणी बेकायदेशीर बॅनर लावतं आहे. महापालिकेकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. एवढी राजकीय बॅनर्स झाली आहेत की मला आता मळमळू लागलं आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in