Yuvasena : प्रस्थापित नेत्यांच्या मुलांना आदित्य ठाकरेंचा दणका
(Aditya thackeray announce new appointment in Yuvasena) मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवासेनेची नवी कार्यकारिणी गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये ठाकरेंनी प्रस्थापित आणि निष्ठावंत नेत्यांच्या मुलांना, कार्यकर्त्यांना दणका दिला आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव वगळता एकाही आमदार, खासदार किंवा प्रस्थापित नेत्यांच्या मुलांना […]
ADVERTISEMENT

(Aditya thackeray announce new appointment in Yuvasena)
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवासेनेची नवी कार्यकारिणी गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये ठाकरेंनी प्रस्थापित आणि निष्ठावंत नेत्यांच्या मुलांना, कार्यकर्त्यांना दणका दिला आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव वगळता एकाही आमदार, खासदार किंवा प्रस्थापित नेत्यांच्या मुलांना संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे युवासेनेत प्रचंड नाराजीचा सूर आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर देखील एकनिष्ठ राहिलेले खासदार राजन विचारे, आमदार सुनिल शिंदे, राजन साळवी, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि इतर महत्वाच्या नेत्यांच्या मुलांना आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळेच पक्षात नाराजीची लाट असल्याची माहिती आहे.
कोणाला मिळालं स्थान?
आजच्या कार्यकारिणीमध्ये मुंबईतील तीन, कोकण एक आणि विदर्भातून एक अशा पाच जणांना संधी देण्यात आली आहे.