Irshalwadi Landslide: ‘आपल्याला लाज वाटली पाहिजे..’, इर्शाळवाडीला पोहचताच उद्धव ठाकरे संतापले

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray, who went to console the families of the victims after the accident in Irshalwadi, expressed some anger about the system. It has also demanded to start some schemes to prevent such incidents from happening.
Uddhav Thackeray, who went to console the families of the victims after the accident in Irshalwadi, expressed some anger about the system. It has also demanded to start some schemes to prevent such incidents from happening.
social share
google news

इर्शाळवाडी: रायगड (Raigad) जिल्ह्यातील इर्शाळवाडी (Irshagwadi) येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली आहे. याच ठिकाणी आज (22 जुलै) शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे इर्शाळवाडीला पोहचले. यावेळी झालेल्या दुर्घटनेबद्दल त्यांनी दु:ख तर व्यक्त केलंच पण त्यासोबतच त्यांनी संताप देखील व्यक्त केला. (should feel ashamed got angry shiv sena ubt chief uddhav thackeray as soon as he reached irshalwadi raigad live update maharashtra)

‘आपण राजकारणी म्हणून यांच्याकडे मतं मागायला जातो. आपल्याला लाज वाटली पाहिजे की, सरकार बदलल्यानंतर.. पण दुर्लक्ष न करता आता प्रकारच्या गोष्टींबाबत काम केलं गेलं पाहिजे.’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ते इर्शाळवाडीला दिलेल्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

पाहा उद्धव ठाकरे इर्शाळवाडीला नेमकं काय म्हणाले:

‘दर एक दोन वर्षानंतर अशा दुर्घटना घडतात आणि आपण खडबडून जागे होतो.. कालांतर हे विषय थंडावतात. दुर्दैवाची बाब आहे. मी यात राजकारण करू इच्छित नाही. पण राजकारणी म्हणून सर्वांना लाजिरवाणी गोष्ट आहे. आज देखील महाराष्ट्रात अशा अनेक वस्त्या आहेत की, ज्या डोंगरकपारीत किंवा डोंगर उतारावर आहे. जिथे कधीही दरडी कोसळू शकतात.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘मी स्वत: तळीये गावात गेलो होतो त्यावेळी पाहिलं होतं की, होत्याचं नव्हतं झालेलं. आता सुद्धा या ग्रामस्थांशी बोललो. पण काय बोलू, कसं सांत्वन करु.. आणि त्यांच्यासाठी मी करू तरी काय शकतो. हे नंतर आपण जागे होतो आणि धावपळ केल्यासारखं दाखवतो. त्यापेक्षा माझं मत प्रामाणिकपणाने हेच आहे की, सर्वच पक्षाने याबाबतीत राजकारण बाजूला ठेवून एकत्र यायला पाहिजे.’

‘आज देखील मला निवेदन देण्यात आलं.. त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. की, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन सुद्धा आज अनेक लोकं आहेत की, ज्यांना असं जीवन जगावं लागत आहे. याकरिता पहिल्यांदा फक्त इर्शाळवाडीच नाही.. तर आजूबाजूच्या वस्त्या वाडी आहेत त्यांना एकत्र करून एक योजना करायला पाहिजे.’

हे ही वाचा >> Ajit Pawar: ‘मी 10 वीला नापास झालेलो..’, अर्थमंत्री अजितदादांचं नेमंक शिक्षण किती?

‘एक योजना.. मी मुख्यमंत्री असताना करण्याचा प्रयत्न करत होतो. या महाराष्ट्रात अशा ज्या वस्त्या आहेत त्यांचं जवळपासच्या गावांमध्ये किंवा परिसरात पुर्नवसन कसं करू शकतं अशी योजना केली गेली पाहिजे. सरकार कोणाचंही आलं गेलं तरी या योजनेला स्थगिती देता कामा नये. एवढी माणुसकी आपण शिल्लक ठेवलीच पाहिजे.’

‘काही दिवसानंतर तळीये गावातील बाधितांबाबत देखील विचारणा करणार आहे. की, किती लोकांचं पुर्नवसन झालं आहे. आपण राजकारणी म्हणून यांच्याकडे मतं मागायला जातो. आपल्याला लाज वाटली पाहिजे की, सरकार बदलल्यानंतर.. स्थगिती दिली असं म्हणत नाही.. पण दुर्लक्ष न करता आता काम केलं गेलं पाहिजे.’

ADVERTISEMENT

‘आज मी सरकारकडे पक्ष म्हणून बघत नाहीए. मी जनतेचं सरकार म्हणून बघतोय. मला जायला काय कमीपणा नाही. पण हे घडल्यानंतर.. मी पुन्हा सांगतोय की, मुख्यमंत्री असताना तळीये असेल, चिपळूण असेल मग सुरक्षित ठिकाणी हलविण्याची योजना केली पाहिजे.’

‘खूप मोठ्या मागण्या वैगरे मी काही करणार नाही. कारण केंद्र फार मोठं आहे. त्यांना मणिपूरच्या प्रश्नात लक्ष द्यायला वेळ मिळालं तर मी त्यांच्याशी बोलेन. पण मला आता राजकारण करायचं नाही.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Irshalwadi Landslide : शोध सुरू, पण आशा मावळल्या! इर्शाळवाडीत काय सुरूये?

‘आता आमचं सरकार पाडून 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. आमचं सरकार असताना तळीये दुर्घटना घडली होती. त्यानंतर या सगळ्या घटनेचं प्लॅनिंग करण्यात 6-8 महिने गेले होते. नंतर कामाला सुरुवात होते ना होतो तोच आमचं सरकार पाडण्यात आलं. पण सरकार पाडलं म्हणून नाही. पण या योजनेकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याचा निधी कोणत्याही प्रकारे रोखता कामा नये. अशी योजना आणणं गरजेचं आहे.’ 

‘दुर्दैवाचा जो आघात झालाय, त्यानंतर आज मी केवळ तुम्हाला तोंड दाखवण्यासाठी आलेलो नाही. तुमच्या पुढच्या आयुष्यात… तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत आम्ही सगळे तुमच्यासोबत राहू. आसपासच्या ज्या वस्त्या आहेत, त्यांच्याशीही आपण संपर्क करू. तुमच्या सगळ्यांचं पुनर्वसन एका व्यवस्थित जागी असं करू की पुन्हा तुम्हाला या अशा संकटाचा सामना करावा लागणार नाही. मागेही मी काही वर्षांपूर्वी आलो होतो. तेव्हाही मी पाहिलं की एका गावात वीज नव्हती. तिथे विजेसाठी प्रयत्न केला होता. पण म्हणून आपण काही जबाबदारी टाळू शकत नाही.’

‘मी प्रामाणिकपणे सांगतो की हे काम खूप अवघड आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक वस्त्या आहेत, ज्या कधीही दरडग्रस्त होऊ शकतात. हा अनुभव येण्याआधी तुमचं पुनर्वसन झालं असतं तर जास्त चांगलं झालं असतं. दुर्दैवाने हे घडलं. आता मात्र तुम्ही सगळे जण एकत्र राहून, अधिकाऱ्यांनाही मी सांगतो की सगळ्यांना विश्वासात घ्या. कारण त्यांना फक्त घर देणं म्हणजे पुनर्वसन नाही. काही मुलं, काही माता भगिनी शिकलेल्या आहेत. त्यांच्या नौकरीची सोय कशी होईल. त्यांच्याकडे जमिनी आहेत, पण त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल हे बघायला पाहिजे.’

‘कंटेनरमध्ये ते कमीत कमी काळ राहून लवकर ते घरात राहायला जातील अशा पद्धतीने प्लॅन तयार करा. या मध्ये कुठेही मी राजकारण आणणार नाही. कारण राजकारणापलीकडे माणुसकी हा एक भाग असतो. मी पुन्हा सांगतो की तुमचं पुनर्वसन होईपर्यंत तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची मदत लागेल ती आम्ही करू. दुःख मोठं आहे आणि सावरावं लागेल. या दुःखात आम्ही तुमच्यासोबत आहोत. मी याबद्दल बोलू शकत नाही, इतकं हे भयानक आहे. आपण सगळे सोबत आहोत आणि फक्त काळजी घ्या.’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

दरम्यान, अद्यापही इर्शाळवाडी येथे एनडीआरएफचे जवान हे ढिगारा उपसण्याचे काम करत आहेत. आतापर्यंत या ठिकाणाहून 22 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पण सध्या कोसळत असलेल्या सततच्या पावसामुळे आणि प्रचंड चिखल यामुळे बचावकार्यात बऱ्याच अडचणी येत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT