राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्रीपदाच्या चाव्या आमदारांच्या हातात?

मुंबई तक

राजस्थानमध्ये अशोक गहलोत यांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री निवडण्यासाठी आज संध्याकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांना निरीक्षक म्हणून पाठवले आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री होण्यास विरोध केला आहे. दरम्यान, नगरविकास मंत्री शांती धारिवाल यांच्या घरी गहलोत गटाच्या आमदारांची बैठक […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राजस्थानमध्ये अशोक गहलोत यांच्या जागी दुसरा मुख्यमंत्री निवडण्यासाठी आज संध्याकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ नेत्यांना निरीक्षक म्हणून पाठवले आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांना मुख्यमंत्री होण्यास विरोध केला आहे. दरम्यान, नगरविकास मंत्री शांती धारिवाल यांच्या घरी गहलोत गटाच्या आमदारांची बैठक होत असून, त्याला केवळ 20 आमदार पोहोचले आहेत. हे लोक आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांना विधिमंडळ पक्षाचे नेते बनविण्यास विरोध केल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन उपस्थित राहतील, त्या बैठकीत आमदारांनी आपले म्हणणे मांडावे, अशी गहलोत यांची इच्छा आहे. त्याचवेळी पायलट यांना गांधी कुटुंबाकडून पाठिंबा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की, राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतरच घ्यावा, अशी गहलोत यांची इच्छा आहे.

जयपूर येथे आज होणाऱ्या बैठकीला सोनिया गांधी यांनी पाठवलेले निरीक्षकही उपस्थित राहणार आहेत. खर्गे आणि अजय माकन तेथील परिस्थितीचे विश्लेषण करतील आणि त्यानंतर त्याचा अहवाल काँग्रेस अध्यक्षांना सादर करतील. 24 सप्टेंबरपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत अशोक गहलोत यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यासाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, गहलोत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री रमेश मीणा यांनी आज तकशी बोलताना सांगितले की, पक्ष नेतृत्व म्हणजेच हायकमांड जो निर्णय घेईल तो सर्व आमदारांना मान्य असेल.

अशोक गहलोत गटातील आमदारांची बैठक

राजस्थानमध्ये गहलोत गटाचे 20 आमदार नगरविकास मंत्री शांती धारीवाल यांच्या घरी बैठक घेत आहेत. गहलोत गट शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र, गहलोत यांच्या अनेक समर्थकांनी बैठकीला येण्यास नकार दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, अशोक गहलोत गटाची बंडखोर वृत्तीही दिसून आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp