“मिंधेंसारखा निर्लज्जपणे…”, सूरज चव्हाणच्या अटकेवर आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन
भाजप आणि मिंधेंमध्ये सामील झाले नाहीत, कारण ते देशभक्त आहेत! नाहीतर, प्रत्येक भ्रष्ट राजकारण्यांसारखेच मिंधे राजवटीत मंत्री झाले असते, असा हल्ला आदित्य ठाकरें यांनी यावेळी चढवला.
ADVERTISEMENT
Aditya Thackeray Criticize Eknath Shinde, Suraj Chavan Arrested : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय असलेल्या सूरज चव्हाणला 17 जानेवारीला बुधवारी रात्री ईडीने अटक केली होती. मुंबई महापालिकेतील खिचडी घोटाळा प्रकरणात त्यांना ही अटक झाली आहे. या अटकेनंतर शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (Shivsena UBT) चांगलाच आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाने सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्ला करायला सुरुवात केली आहे. त्यात आदित्य ठाकरे यांनी मिंधेंसारखा सूरज निर्लज्जपणे झुकला नाही म्हणूनच त्याला सतावले जात असल्याची टीका केली. (aditya thackeray criticize eknath shinde government on suraj chavan arrested bmc khichdi scam)
ADVERTISEMENT
सूरज चव्हाण याच्या अटकेनंतर आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर हल्ला चढवला आहे. मिध्यांची टोळी राज्यातील लोकशाही संपवून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच सूरज मिंधेंसारखा निर्लज्जपणे झुकले नाहीत, म्हणूनच त्याला सतावले जात आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच भाजप आणि मिंधेंमध्ये सामील झाले नाहीत, कारण ते देशभक्त आहेत! नाहीतर, प्रत्येक भ्रष्ट राजकारण्यांसारखेच मिंधे राजवटीत मंत्री झाले असते, असा हल्ला आदित्य ठाकरें यांनी यावेळी चढवला.
हे ही वाचा : Satara Lok Sabha : उदयनराजेंची लोकसभेसाठी फिल्डिंग! फडणवीसांना म्हणाले, ”मलाही…’
स्वाभिमान, हिंमत, ताकद, स्वच्छ मन आणि सच्चा दिलाचा सूरज आहे. आम्ही सगळेच सत्यासाठी लढत राहू. लोकशाही, सत्य, संविधान ह्यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच! महाराष्ट्र पाहत आहे, जग पाहत आहे, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
आदित्य ठाकरे यांचे ट्विट जशाच तसे
लोकशाही संपवून आपल्या राज्यात मिंध्यांची टोळी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जेवढी घाबरट आणि पोकळ राजवट, तेवढी जास्त त्यांची मस्ती आणि एजन्सीचा वापर… अशीच ही मिंधे राजवट…
मिंधेंसारखा निर्लज्जपणे झुकले नाहीत, म्हणूनच सूरजला सतावले जात आहे! भाजप आणि मिंधेंमध्ये सामील झाले नाहीत, कारण ते देशभक्त आहेत! नाहीतर, प्रत्येक भ्रष्ट राजकारण्यांसारखेच मिंधे राजवटीत मंत्री झाले असते.
ADVERTISEMENT
स्वाभिमान, हिंमत, ताकद आणि स्वच्छ मन… सच्चा दिलाचा सूरज आहे. आम्ही सगळेच सत्यासाठी लढत राहू!
ADVERTISEMENT
लोकशाही, सत्य, संविधान ह्यासाठी आमचा लढा आहे आणि आम्ही जिंकणारच!
महाराष्ट्र पाहत आहे, जग पाहत आहे!
हे ही वाचा : नवऱ्याने घेतली बायकोची अग्निपरीक्षा, लग्नाच्या पहिल्याच रात्री अनैसर्गिक…
लोकशाही संपवून आपल्या राज्यात मिंध्यांची टोळी हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करीत आहे. जेवढी घाबरट आणि पोकळ राजवट, तेवढी जास्त त्यांची मस्ती आणि एजन्सीचा वापर… अशीच ही मिंधे राजवट…
मिंधेंसारखा निर्लज्जपणे झुकले नाहीत, म्हणूनच सूरजला सतावले जात आहे! भाजप आणि मिंधेंमध्ये सामील…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 18, 2024
सूरजचा मला अभिमान वाटतो
निर्लज्ज हुकूमशाही आणि त्यांच्या एजंन्सीपूढे न झुकणाऱ्या अशा देशभक्तांचा सहकारी असल्याचा मला अभिमान वाटतो, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. सत्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आपल्या संविधानासाठी नेहमीच उभे राहिले आहे. त्याला राजवटीने विकत घेण्यास नकार दिला आणि तेथे त्याचा छळ केला जात असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी एक्सवर सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT