अजित पवार मुख्यमंत्री झाले तर…अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar cm speculation devendra fadnavis wife amruta fadnavis reaction
ajit pawar cm speculation devendra fadnavis wife amruta fadnavis reaction
social share
google news

Amruta Fadnavis Reaction on Ajit Pawar CM : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी सकाळ माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत, मला 100 टक्के मुख्यमंत्री व्हायला आवडेल, अशी इच्छा व्यक्त केली होती. अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवरील विधानानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता याच घटनेवर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आवडेल, त्याने फक्त 24 तास महाराष्ट्रासाठी काम केले पाहिजे,असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत. (ajit pawar cm speculation devendra fadnavis wife amruta fadnavis reaction)

ADVERTISEMENT

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) एका कार्यक्रमाला पोहोचल्या होत्या. यावेळी पत्रकारांनी अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर प्रश्न विचारला होता. यावेळी त्या म्हणाल्या,आपला महाराष्ट्र एक असं राज्य आहे, जे खुप काही करू शकते, आणि आता करते ही आहे. यासाठी जो ही माणूस आपल्या जनतेला, किंवा त्या पक्षाला ठिक वाटला, तो त्या पदाला न्याय देऊ शकेल असेल तर त्यांनी यावं, ते आपल्या महाराष्ट्रासाठी चांगले आहे, मग तो कोणी असो. आणि मला कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आवडेल, त्याने फक्त 24 तास महाराष्ट्रासाठी काम केले पाहिजे, असेही त्यांनी मत मांडले. तसेच प्रत्येक माणसाने विचार करावा की तो प्रगतीसाठीच काम करणारा असावा, नाकी स्वत:च्या घरासाठी, असेही त्या म्हणाल्या आहेत.

अजित पवार (Ajit pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात किती जवळीक आहे,असा सवाल त्यांना पत्रकारांनी विचारला होता. यावर त्या म्हणाल्या की,ते त्या दोघांना जास्त माहितीय. तसेच राजकीय नेत्यांची खुप लोकांशी जवळीक असते, खुप ठिकाणी ते लोक डोळे मारतात, मला माहित नाही आता त्यांनी कुठे कुठे डोळे मारलाय,असा टोला देखील अमृता (Amruta Fadnavis) यांनी अजित पवार यांना लगावला.

हे वाचलं का?

संजय़ राऊत काय म्हणाले?

अजित पवारांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्षापासून राजकारणात असून मंत्रीही होते. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं.काही लोक जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, असा टोला संजय राऊंत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT