'अजितदादांच्या अपघाताचं राजकारण करू नका,' सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंना थेट सुनावलं!
अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारवर सवाल उपस्थित केले. यावर सुनेत्रा पवार यांनी तपास यंत्रणांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन करत, दादांच्या जाण्याचं राजकारण करू नये, असं सुनावलं आहे.
ADVERTISEMENT

पुणे: अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी सरकारमधील 40 आमदार आणि 8 ते 9 मंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “माझ्या भावाच्या एफआयआर किंवा चौकशीबद्दल एक शब्द तरी काढलाय का?” असा सवाल केला. यावर सुनेत्रा पवार यांनी थेट प्रतिक्रिया देत, “दादांच्या जाण्याचं अशा प्रकारचं राजकारण कोणीच करू नये,” असं म्हटलं. तसंच, चौकशी लवकरात लवकर व्हावी, अशी कुटुंबाचीही इच्छा असून तपास यंत्रणांवर विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं.
अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवरून सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले. अजितदादा याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, मग त्यांच्या अपघाताचा एफआयआर का झाला नाही, असा सवाल त्यांनी केला.
“आमच्या घरातील कर्ता पुरुष गमवलाय आम्ही. यांच्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते ना. त्याचा एफआयआर केला नाही, पण अमित ठाकरेंचा एफआयआर दोन तासांत झाला. हा कुठला न्याय?”
हे ही वाचा>> Center Point | विद्यानंद बापट, संतोष पंडित यांना भूमिका मांडल्याची किंमत मोजावी लागतेय?
सुप्रिया सुळे यांनी पुढे सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांवरही निशाणा साधला. अजित पवार यांचे 40 आमदार आणि 8 ते 9 मंत्री सत्तेत आहेत. मात्र, त्यापैकी एकानेही अजितदादांच्या एफआयआर किंवा चौकशीबद्दल एक शब्द काढलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.
