Nawab Malik : फडणवीसांचा लेटर बॉम्ब, अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया
आमदार नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप झाले असले तरी ते आरोप अजून सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आताच त्यांना आरोपी का समजले जाते आहे असा सवाल अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
NCP-BJP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Nationalist Congress Party) गटाचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी झाले होते. त्यांच्या आजच्या सहभागावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी जाहिरपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले. त्या पत्रात आमदार नवाब मलिक (MLA Nawab Malik) यांच्यावर देशद्रोहाचे आरोप असल्याने त्यांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही असं त्यांनी पत्रातून सांगितले. त्यावरच अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण (Spokesperson Suraj Chavan)यांनी राष्ट्रवादीची नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय आहे ते त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी मलिकांच्या पाठीशी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रं लिहिताच त्यावरून आता जोरदार गदारोळ उठला आहे. कारण महायुती असल्याने आणि नवाब मलिकांनी विधिमंडळाच्या कामकाजात सहभाग घेतल्याने देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर अजित पवार गटाची बाजू मांडत सूरज चव्हाण यांनी नवाब मलिकांवरील आरोप अजून सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे तुम्ही त्यांना आरोपी का समजता असा सवालही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर नवाब मलिक यांच्या पाठीशी राष्ट्रवादी खंबीरपणे उभा राहिले असंही त्यांनी सांगितले. अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी नवाब मलिक यांची बाजू घेत त्यांनी अजित पवार गटाची बाजूही समर्थपणे मांडली. यावेळी त्यांनी हीच गोष्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्तिशः भेटूनही सांगू शकले असते असंही त्यांनी आपले मत मांडले.
हे ही वाचा >> Maharshtra Breaking News Live: नवाब मलिकांना महायुतीत घेऊ नका, देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना थेट जाहीर पत्र
फडणवीसांचे पत्र भाजपचे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलं पत्रं लिहिले असले तरी त्यांनी हे पत्र उपमुख्यमंत्री म्हणून लिहिले नाही तर भाजपचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी हे पत्र लिहिले असावे अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र लिहिले असले तरी त्याबाबतचा निर्णय हा अजित पवारच घेतील, त्यामुळे इतर कोणी आमच्या पक्षात आम्ही काय करावे हे सांगण्याची गरज नाही असंही त्यांनी सांगितले.
हे वाचलं का?
मलिकांना गुन्हेगारच समजतात
आमदार नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर असले तरी त्यांच्या झालेले आरोप अजून सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे त्यांना आरोपी समजणे चुकीचे आहे. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र ते सिद्धच होतील असं नाही. त्यामुळे त्यांच्यावर फक्त आरोप करण्यात आले आहेत, ते अजून सिद्ध झाले नाहीत असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.
देशद्रोही कसं म्हणता
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार नवाब मलिक यांची दोन्ही गटातील नेत्यांकडून भेटीगाठी घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनात मलिकांनी नागपूरात जात त्यांनी विधिमंडळाच्या कामकाजात सहभागही नोंदवला. त्यावरून आता राजकारण तापले आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप असताना त्यांना कामकाजात सहभाग करुन घेणं योग्य होणार नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिले. त्यामुळे सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे की, त्यांच्यावर अजून आरोप सिद्ध झाले नाहीत त्यामुळे भाजपकडून त्यांना का आरोपी समजले जाते आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> मुलाने आठ वर्षाच्या मुलीचा गळा घोटला, बापाने मृतदेह पिशवीत भरला अन्…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT