Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण? सर्व्हे काय सांगतोय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

in the abp c voter survey people said sharad pawar is real chief of ncp.
in the abp c voter survey people said sharad pawar is real chief of ncp.
social share
google news

Who is Ncp Chief : शरद पवारांनी प्रदेशाध्यक्षपदाची भाकरी फिरवण्याआधीच अजित पवार यांनी वेगळी चूल मांडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला असून, स्वतःची पक्षाच्या अध्यक्षपदी वर्णी लावली आहे. दुसरीकडे शरद पवारांनी ही निवड अवैध असल्याचे म्हटले आहे. एबीपी सी व्होटरने याच मुद्द्यावर एक सर्व्हे केला असून, राष्ट्रवादीचा खरा अध्यक्ष कोण यावर लोकांनी कौल दिला आहे. (C voter Survey on ncp split)

शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे राष्ट्रवादीतील काही आमदारांसोबत घेऊन एनडीएमध्ये सामील झाले. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावर दावा ठोकला आहे. त्यांच्या गटाने अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.

राष्ट्रवादीत हा वाद सुरू झाल्यानंतर सी व्होटरने एबीपी न्यूजसाठी एक सर्व्हे केला. गुरूवारी (6 जुलै) आणि शुक्रवारी (7 जुलै) हा सर्व्हे करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे अध्यक्ष कोण? असा प्रश्न या सर्व्हेमध्ये विचारण्यात आला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> ‘अजित पवारांना आरएसएस, नितीन गडकरी गटाचा विरोध’, पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितली सगळी स्टोरी

यावर 66 टक्के लोकांनी शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे खरे अध्यक्ष असल्याचे म्हटले आहे. तर 25 टक्के लोकांनी अजित पवारांच्या बाजूने कौल दिला आहे. 9 टक्के लोक तटस्थ आहेत.

Sharad Pawar or ajit pawar, Who is real ncp chief?

ADVERTISEMENT

शरद पवार पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस उभी करू शकतील का? लोक म्हणतात…

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. पक्षात बंड झाल्यानंतर शरद पवारांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा जनतेसमोर जाऊ आणि पक्ष बांधणी करू असं म्हटलं.

ADVERTISEMENT

सी व्होटरच्या सर्व्हेत वयाच्या 83 व्या वर्षी शरद पवार हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्याने उभा करू शकतील का? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर लोकांनी दिलेला कौल दखल घेण्यासारखा आहे.

वाचा >> ‘मला माफ करा, माझा अंदाज..’, भुजबळांच्या करेक्ट कार्यक्रमासाठी शरद पवारांचा नामी डाव!

लोकांनी यावर प्रश्नावर शरद पवारांच्या बाजूने कौल दिला आहे. 57 टक्के लोकांना असं वाटतं की, शरद पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देतील. तर 37 टक्के लोकांना असं वाटत नाही. 6 टक्के लोकांनी सांगता येत नाही, असं उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हा सर्व्हे करण्यात आला. यासाठी महाराष्ट्रातील 1 हजार 790 लोकांशी संवाद केला गेला. 6 जुलै आणि 7 जुलै असे दोन दिवस हा सर्व्हे करण्यात आला असून, लोकांचा कौल शरद पवार यांच्या बाजूने जास्त दिसत असल्याचे आकड्यांतून समोर आलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT