'मराठी असले तरी फडणवीस, शेलार आणि साटम यांच्यात...' मुंबई तकच्या चावडीवर अंबादास दानवे कडाडले
Ambadas Danve : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुंबई तक चावडीवर महायुतीवर टीकेचे असुड सोडले आहे. त्यात मुख्यत्वे त्यांनी भाजपच्या मराठी नेत्यांनाही चांगलंच सुनावलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'शेलार, साटम यांच्यात कोणता मराठी बाणा?'
मुंबई तकच्या चावडीवर अंबादास दानवे कडाडले
Ambadas Danve : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुंबई तक चावडीवर महायुतीवर टीकेचे असुड सोडले आहे. त्यात मुख्यत्वे त्यांनी भाजपच्या मराठी नेत्यांनाही चांगलंच सुनावलं आहे. मुंबई मिळाली ही 106 हुतात्म्यांनी रक्त सांडल्याने मिळाली आहे. मग या महापालिकेचा महापौर हा दुबे, शर्मा, वर्मा नकोच... काही भाजपमध्ये देखील साटम, शेलार सारखे मराठी नेते आहेत, पण त्यांच्याकडे मराठी बाणा आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत खडेसोब सुनावलं आहे.
'शेलार, साटम यांच्यात कोणता मराठी बाणा?'
जसं राज ठाकरे म्हणाले की, मराठी माणूस हा वाटला गेलेला आहे. जसं की शेलार, साटम. मराठी म्हणून यांच्यात मराठी बाणा कोणता आहे? मराठी बाणा कसा असतो ते मी सांगतो. तेव्हा त्यांनी आपल्या हाताची वज्रमूठ करत असा मराठी बाणा असतो, असं वक्तव्य केलं. तसेच त्यानंतर ते पुढे म्हणाले की, मराठी बाणा हा मराठीच असतो, त्याला गुजरातचा बाणा म्हणता येत नाही, असं म्हणत त्यांनी साटम आणि आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केला.
मारहाण करणं म्हणजेच मराठी बाणा आहे का?
त्यानंतर त्यांना परप्रांतियांना मारहाण करणं म्हणजेच मराठी बाणा आहे का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, कोणी का महापौर करायचा? मुंबई मराठी माणसाचीच आहे, उद्या पाकिस्तानातून एखादा इकडं आला आणि इथं राहू लागला तर तुम्ही त्याला महापौर पदावर बसवणार का? हा महाराष्ट्र आपला आहे, मराठी माणसांचा आहे. या मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं, त्यामुळे मुंबईचा महापौर पद कोणत्याही व्यक्तिला द्यायचे नसून यावरच आमचा ऑबजेक्शन आहे.
त्यांच्या या उत्तरानंतर त्यांना विचारलं की, मुंबईत राहणारे लोक मराठी नाहीत का? त्यावर ते म्हणाले की, आहेच पण, कोणीही कसा महापौर होईल. तुम्ही उद्योगधंदा करायला आलात, तर उद्योगधंदाच करा, असं म्हणत त्यांनी महायुतीला सुनावलं.










