Anil Deshmukh Book : '...नाहीतर घरातल्या महिलांनाही चौकशीला बोलवू', देशमुखांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
अनिल देशमुख यांच्या या पुस्तकात त्यांनी काय खुलासे केलेत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यांनी केलेल्या पुस्तकाबद्दलच्या ट्वीटमध्ये पुस्तकाचं कव्हर पेज दाखवण्यात आलंय.त्यामाध्यमातून बरेच संकेत देण्यात आले आहेत. तसंच चौकशीदरम्यानचे काही प्रसंगही सांगितले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अनिल देशमुख यांचं पुस्तक

ईडी चौकशी दरम्याचे प्रसंग

राजकीय वर्तुळात खळबळ माजणार?
Anil Deshmukh Book : हर सुर्खी के पिछे एक गहरी कहाणी छिपी होती है... एखाद्या चित्रपटाच्या सुरूवात व्हावी अशी ही ओळ लिहित माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक ट्वीट केलंय. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आगामी पुस्तकाची माहिती दिली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा कार्यकारळ वादातीत ठरला होता. तसंच त्यानंतरही ते मोठा काळा तुरुंगात राहिले होते. एकूणच या सर्व इतिहासामुळे ते या पुस्तकात नेमकं काय लिहिणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. त्यांनी केलेल्या पुस्तकाबद्दलच्या ट्वीटमध्ये पुस्तकाचं कव्हर पेज दाखवण्यात आलंय.त्यामाध्यमातून बरेच संकेत देण्यात आले आहेत. तसंच चौकशीदरम्यानचे काही प्रसंगही सांगितले आहेत. (Anil Deshmukh Book The Diary of Home Minister to stir Maharashtra Politics)
"डायरी ऑफ ए होम मिनिस्ट : सत्ता, साजिश और सच्चाई : एक गृहमंत्री की संघर्षगाथा" या नावाने लवकरच अनिल देशमुख यांचं पुस्तक येणार आहे. यामाध्यमातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा ते करणार असल्याचं दिसतंय. या पुस्तकाच्या कव्हर पेजवर याबद्दलची माहिती मिळते. या पुस्तकात अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्याची माहिती समोर आली आहे. तसंच आपल्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर खोटे खटले दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता असाही उल्लेख केल्याचं म्हटलं जातंय.
पुस्तकाच्या पृष्ठावर काय लिहिलंय?
हे ही वाचा >>Salman Khan Case : लॉरेन्सच्या नावाने सलमानला धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या, भाजीवाला म्हणाला मी...
"डायरी ऑफ ए होम मिनिस्टर ही एक रोमांचक आत्मकथा आहे. या पुस्तकात ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी आपल्या जीवनातील सर्वात आव्हानात्मक काळाबद्दलचे खुलासे केले आहेत. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडल्याच्या कोविड काळातील प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता, तिथून या सर्व संघर्षमय काळाची सुरूवात झाली होती. यावेळी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं, मात्र भ्रष्ट पोलीस, विरोधी पक्ष आणि केंद्रीय यंत्रणांनी त्यांच्याविरोधात षडयंत्र तयार करुन त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये झालेले बदल या पुस्तकात मांडलेले आहेत. तसंच एका नेत्याने अन्यायाविरोधात लढून आपली प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षही मांडण्यात आलाय . महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार दशकांपासून सक्रीय असलेल्या अनिल देशमुख यांनी जेलमध्ये असताना लिहिलेलं हे पुस्तक त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तिचं प्रतिकही आहे. डायरी ऑफ होम मिनिस्टर हे पुस्तक त्या प्रत्येक माणसासाठी प्रेरणा आहे, जे सत्तेमागे असलेल्या अंधारावर प्रकाश टाकू पाहतायत."
अनिल देशमुख यांच्या पुस्तकातला एक प्रसंग
"चौकशीच्या सुरूवातीलाच हडबडलेल्या ईडीच्या अधिकाऱ्याने मला विचारले की, तुमचं वर काही बोलणं झालंय का?