Arvind Kejriwal : जेलमधून बाहेर येताच केजरीवालांची मोठी घोषणा, ''दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा...''

मुंबई तक

ADVERTISEMENT

arvind kejriwal announce resign i am going to regign from cm position after two dayr delhi cm aap politics
मी 2 दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आज मी अग्निपरीक्षा देण्यास तयार आहे

point

मी 2 दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

point

...तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही

Arvind Kejriwal Resign CM Post : मद्य धोरण घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जेलमधून बाहेर येताच अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना एक मोठी घोषणा केली आहे. ''मी 2 दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही'', अशी मोठी घोषणा केजरीवालांनी केली आहे.  (arvind kejriwal announce resign i am going to regign from cm position after two dayr delhi cm aap politics) 

''सीता जेव्हा वनवासातून परतली होती तेव्हा तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. आज मी तुरुंगातून आलो आहे आणि मी अग्निपरीक्षा देण्यास तयार आहे. त्यामुळे मी 2 दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही. मी प्रत्येक घराघरात जाऊन रस्त्यावर जाईन आणि जोपर्यंत जनता निकाल देत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही'', असा निर्धार अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे द्यायची याचा निर्णय एक-दोन दिवसांत होईल. मी जे म्हणतो तेच मनीषजीही म्हणतात. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळणार, पण कधी अन् किती वाजता?

येत्या दोन दिवसात मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईन. या काळात आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल.त्या बैठकीत माझ्याऐवजी आपमधील दुसरा कोणत्यातरी नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड केली जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच  दिल्लीच्या निवडणुका आजपासून काही महिन्यांवर आहेत, जर तुम्हाला केजरीवाल प्रामाणिक वाटत असतील तर आगामी निवडणुकीत माझ्या बाजूने मतदान करा. तुमचे प्रत्येक मत माझ्या प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र असेल, असे आवाहन केजरीवालांनी दिल्लीच्या जनतेला केले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT


 
आमच्या प्रामाणिकपणाची त्यांना  (भाजप) भीती वाटते, ते अप्रामाणिक असल्यामुळे मोफत वीज देऊ शकत नाहीत. अनेक राज्यात त्यांची सरकारे आहेत पण ते उपचार देऊ शकत नाहीत, शाळा दुरुस्त करू शकत नाहीत. त्यांनी आमच्याविरुद्ध ईडी, सीबीआय सोडले पण आम्ही प्रामाणिक आहोत. ते माझ्यावर चिखलफेक करत आहेत, सकाळ संध्याकाळ शिवीगाळ करत आहेत. पण माझ्यासाठी भाजप महत्त्वाचा नाही, तुम्ही लोक माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. मी आयुष्यात काहीही कमावले नाही पण मान मिळवला आहे, असा हल्ला केजरीवालांनी भाजपवर चढवला. 

 ''माझी हात जोडून विनंती...'' 

'देशाची लोकशाही वाचवायची आहे म्हणून मी राजीनामा दिला नाही. मी राजीनामा दिला असता तर... त्यांनी एक एक करून सर्वांना तुरुंगात टाकले असते कारण त्यांनी सिद्धरामय्या, ममता दीदी, पिनारायी विजयन यांच्यावर खटला दाखल केला आहे, मला हात जोडून विनंती करायची आहे, देशातील सर्व बिगर भाजप मुख्यमंत्र्यांना. आता पंतप्रधानांनी खोटा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकले तर राजीनामा देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देऊ नका, जेलमधून सरकार चालवा. असे नाही की आपल्याला पदाचा लोभ आहे, कारण आपली राज्यघटना आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि लोकशाही वाचवणे महत्त्वाचे आहे, असे केजरीवाल म्हणाले आहेत. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ganesh Visarjan 2024: बाप्पाचं विसर्जन घरीच करताय? मग थोडं थांबा...

    follow whatsapp

    ADVERTISEMENT