Ashok Chavan : 'मुंबई काँग्रसचे अध्यक्ष...' चव्हाण बोलून फसले मग फडणवीसांनी सुधारली चूक

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

 ashok chavan join bjp devendra fadnavis bjp mumbai office press conference maharashtra politics
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा हा पक्षप्रवेश पार पडला.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अशोक चव्हाण भाजप ऐवजी काँग्रेस बोलून गेले

point

देवेंद्र फडणवीसांनी लगेच चूक सुधारली

point

भाजप कार्यालयात एकच हशा पिकला

Ashok Chavan Join Bjp : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा हा पक्षप्रवेश पार पडला. या पक्ष प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण (Ashok Chavan) भाजप ऐवजी काँग्रेस बोलून गेले होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) लगेच त्यांची चूक सुधारली. या दरम्यान भाजप कार्यालयात एकच हशा पिकला होता. (ashok chavan join bjp devendra fadnavis bjp mumbai office press conference maharashtra politics)  

ADVERTISEMENT

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई काँग्रसचे अध्यक्ष आमचे सहकारी...असे चव्हाण बोलले आणि कार्यालयात एकच हशा पिकला.

हे ही वाचा : भाजपात जाताच अशोक चव्हाण म्हणाले, "हा राजकीय अपघातच..."

हे वाचलं का?

यावेळी चव्हाणांच्या बाजूलाच बसलेल्या असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी लगेचच 'भाजपचे' बोलून त्यांची चुक सुधारली.  यावेळी एकच हशा पिकला होता. सवयीचा परिणाम आहे. 50 वर्षाची सवय असल्यामुळे...आणि पहिलीची प्रेस कान्फरेन्स भाजप कार्यालयात होत असल्याने असे कारण सांगत, तेवढं आम्हाला सांभाळून घ्या, अशी विनंती त्यांनी माध्यमांना केली. 

काय म्हणाले अशोच चव्हाण?

ADVERTISEMENT

गेल्या 38 वर्षाचा राजकीय प्रवास आहे, आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, स्फुर्ती आणि प्रेरणा घेऊन, देशामध्ये आणि राज्यामध्ये चांगलं काम करता आलं पाहिजे, सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल केली पाहिजे आणि राज्याच्या आणि देशाच्या योगदान दिलं पाहिजे, या प्रामाणिक भूमिकेतून पक्षप्रवेश केला असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

मी आजपर्यंत प्रामाणिकपणे काम केलेले आहे. आणि मी तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो की भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करेन, पक्षाला कशी ताकद मिळेल, आगामी निवडणूकीत जास्तीत जास्त यश देशात तर मिळेलच पण महाराष्ट्रात कशा पद्धतीने मिळवता येईल, यासाठी माझ्या अनुभवाचा वापर करवून मिळवू, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : Ashok chavan : आदर्श घोटाळा अन् चव्हाण मुख्यमंत्री पदावरून पायउतार

क नवीन सरूवात मी करतो आहे. भाजपचे जी ध्येयधोरणे आहेत. त्या पद्धतीने निश्चितच काम केले जाईल. पक्ष जो मला आदेश देईल, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे सांगतील त्या पद्धतीने काम करण्याचा माझा मानस आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT