Lok Sabha : भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्राला का स्थान नाही?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर अमित शाह गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहे.
bjp candidate list of lok sabha elction there is no maharashtra candidate in first list vinod tawade eknath shinde devendra fadnavis ajit pawar
social share
google news

BJP candidate list of Lok sabha elction 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आज पहिली यादी जाहीर करण्यात आली.  भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी 195 उमेदवारांची ही यादी जाहीर केली आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर अमित शाह गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे अनेक नेत्यांचे या यादीत नाव असले तरी महाराष्ट्रातील एकाही नेत्याला यादीत संधी मिळाले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील एकाही नेत्याला या पहिल्या यादीत स्थान न मिळण्या मागचं कारण काय? हे जाणून घेऊयात. (bjp candidate list of lok sabha elction there is no maharashtra candidate in first list vinod tawade eknath shinde devendra fadnavis ajit pawar) 

खरं तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर लोकसभेच्या 48 जागांसाठी निवडणूक होणार आहे. आणि सध्या महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजप असे तीनही पक्ष मिळून महायुतीच सरकार आहे. या महायुतीने अद्याप तरी जागावाटप जाहीर केलं नाही आहे. मात्र त्यांचा लोकसभा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. राजकीय सुत्रांनूसार 32-12-4 असा जागावाटपाचा फॉर्म्युला महायुतीत ठरल्याची माहिती आहे. यामध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 32 जागा येतील तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला 12 जागा येतील. तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागू शकते. 

हे ही वाचा : BJP च्या 195 उमेदवारांची यादी, महाराष्ट्रातील केवळ...

महायुतीत अनेक जागेवरून मतभेद आहेत. हे मतभेद चव्हाट्यावरही येत आहेत. जसे नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर दावा सांगितल्यानंतर शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी भाजपवर टीका केली होती. 'रायगड लोकसभा आणि रत्नागिरी लोकसभा वर तुम्ही सांगाल आम्हीच तर असं होत नाही. रत्नागिरीची जी जागा आहे ती शिवसेनेची आहे. तुम्हाला भाजपला सर्व पक्षाला संपवून एकट्याला जिवंत राहायचं का?'' असा सवाल उपस्थित करून शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी भाजपवर टीका केली होती. त्यामुळे महायुतीत अनेक जागेवरून जागावाटपाचा तिढा आहे. हा तिढा जिथपर्यंत सुटत नाही तिथपर्यंत जागावाटप होंणार नाही आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : 2019 ला तिकीट कापलं, आज थेट मोदींचीच उमेदवारी जाहीर

दरम्यान जागावाटपावरून या तीनही पक्षांमध्ये जरी वाटाघाटी होत असली तरी याबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीतून होईल. यामध्ये अमित शाह महत्वाची भूमिका बजावू शकतात. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT