J. P. Nadda यांच्या सभेत श्रोते अर्ध्यातूनच गेले; रिकाम्या खुर्च्यांचे फोटो व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबाद : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या जाहीर सभेतून मोठ्या प्रमाणावर श्रोते अर्ध्यातूनच उठून जात असल्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहेत. विरोधकांनीही यावरुन खुर्च्या रिकाम्या असल्याचं म्हणतं भाजप आणि नड्डांची खिल्ली उडवली आहे. दरम्यान, यामागे भाजपच नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीचाही फटका बसला असल्याचं बोललं जात आहे.

ADVERTISEMENT

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली आहे. भाजपनं मिशन १४४ निश्चित केलं आहे. त्यासाठी प्रत्यक्ष स्थानिक पातळीवर पक्ष बांधणीही सुरू केली आहे. भाजपच्या मिशन १४४ मध्ये महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातीलच एक औरंगाबाद आहे. या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डा औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. यात आज शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची जाहीर सभा पार पडली.

मात्र या सभेदरम्यानच मोठ्या प्रमाणावर श्रोते उठून चालतं जात असल्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होतं आहेत. यातील काही श्रोत्यांनी आपण लांबवरुन आलो असल्याचं सांगितलं. तर महिलांनी आपल्या घरात काम असल्याचं सांगत सभेतून काढता पाय घेतला. मात्र यातील बहुतांश महिलांना आपण नेमकं कोणाच्या सभेला आलो आहोत याचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळे कोणाच्या सभेला जात आहोत हे माहित नसताना या महिला नेमक्या आल्या कशा असाही सवाल विचारला जात आहे.

हे वाचलं का?

पंकजा मुंडेंच्या नाराजीचा फटका?

मागील दोन दिवसांपासून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचं समोर बोललं जात आहे. याचं कारण म्हणजे नड्डा यांच्या सभा आणि दौऱ्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये पंकजा मुंडे यांचं नावच नव्हतं. औरंगाबादच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे काही क्षणच बोलल्या. त्यामुळे त्यांच्या कथित नाराजीचा फटका पक्षाला बसला का असा सवाल विचारला जात आहे.

अंबादास दानवेंचा निशाणा :

दरम्यान, विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नड्डांच्या सभेचे फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत. ”अहो अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, जरूर पहा हा खड्डा.. लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे.. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे.” असं त्यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT