Chhagan Bhujbal : "तुम्ही मला उठ आणि बस सांगणार असाल तर...", छगन भुजबळ संतापले, तुफान बरसले
नागपुरात सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असून, वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र, राज्यात चर्चा सुरू आहे ती मंत्रिपद न मिळालेल्या नाराज आमदारांची. या नाराज नेत्यांमध्ये सर्वाधिक आक्रमक झाले आहेत ते छगन भुजबळ.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
छगन भुजबळ संतापले....
मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज?
पक्षश्रेष्ठींबद्दल काय म्हणाले?
Chhagan Bhujbal : मी काय खेळणं आहे का? चार महिन्यांपूर्वी मी राज्यसभेवर पाठवा म्हणालो होतो, पण आता तुम्ही वाटेल तेव्हा जा वर, या खाली, आता निवडणुका म्हणायला मी काय खेळणं आहे का? अशा शब्दात भुजबळ यांनी पक्ष नेतृत्वावर संताप व्यक्त केला. तुम्ही बस आणि उठ म्हणाल तर तसं करणारा छगन भुजबळ नाही अशी रोखठोक भूमिका भुजबळांनी घेतली.
रविवारी 15 डिसेंबररोजी नागपूरमध्ये राज्यातीस नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. सध्या नागपुरातच अधिवेशन सुरू असून, वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन चर्चा सुरू आहेत. तर दुसरीकडे मात्र, राज्यात चर्चा सुरू आहे ती मंत्रिपद न मिळालेल्या नाराज आमदारांची. या नाराज नेत्यांमध्ये सर्वाधिक आक्रमक झाले आहेत ते छगन भुजबळ. छगन भुजबळ यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहेत. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, पण जी अवहेलना झाली तो प्रश्न आहे असं भुजबळ म्हणाले.
हे ही वाचा >> '...तर अडीच महिन्यातच मंत्री बदलू', महायुतीचा 'हा' कोणता फॉर्म्युला?










