Eknath Shinde: ‘…त्याआधीच त्यांचा टांगा मी पलटी करून टाकला’, CM शिंदेंनी सगळंच सांगितलं!
CM Eknath Shinde Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाषण करताना उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर प्रचंड टीका केली.
ADVERTISEMENT
CM Eknath Shinde again criticized Uddhav Thackeray: मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं आज (25 मार्च) सूप वाजलं. याच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) भाषण केलं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्ला चढवला. मात्र, यावेळी आपण कशा पद्धतीने योग्य वेळी सरकार स्थापन केलं हे देखील सांगितलं. (chief minister eknath shinde again criticized uddhav thackeray while speaking in the legislative assembly)
ADVERTISEMENT
आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी आरोप केला की, ‘महाविकास आघाडी सरकारने खोटे गुन्हे दाखल केले. अनेकांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण तसं काही होऊ दिलं नाही. त्याआधीच त्यांचा टांगा मी पलटी करून टाकला.’
पाहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले:
आम्हाला मिंधे म्हटलं तरी चालेल.. परंतु सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मिंधेपणा कोणी केलाय.. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. सत्तेसाठी आम्ही कधीही तडजोड करणार नाही. आणि म्हणूनच आपण आज पाहिलं की, एखादा निर्णय आपल्या बाजूने येतो तेव्हा ती व्यवस्था चांगली असते. आपल्या विरोधात येते तेव्हा ती व्यवस्था वाईट असते.
‘आज खरं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा.. खरं तर चुना तुम्ही स्वत:च्या पक्षातील लोकांनाच लावत होता. आम्ही जेव्हा बाळासाहेबांच्या विचारासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांची तोंडं चुना लावल्यासारखी पांढरी फटक झाली होती. हे आपण सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे.’
हे वाचलं का?
अधिक वाचा- देवेंद्र फडणवीसांनी ‘ते’ प्रकरण काढलं बाहेर, नेमके आरोप काय?
या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचे दोन मंत्री जेलमध्ये गेले. आपण जिलेटीन कांड पाहिलं आहे. तर तुम्ही काय आम्हाला कायदा-सुव्यवस्थेविषयी बोलणार. तुम्ही जो काही बाजार मांडला होता त्याची कल्पना मी स्वत: अजित पवारांना दिली होती. तेव्हा मी सरकारमध्ये होते. तेव्हा मी सांगितलं.. हे उघड्या डोळ्याने पाहत बसू नका.. यातून काही तरी मोठी घटना घडेल आणि घडली.. म्हणजे गृहमंत्री, मंत्री तुरुंगात जाण्याची वेळ आली. संपूर्ण देशात, जगात छी.. थू झाली.
‘विरोधकांनी या सरकारला कितीही अडवण्याचा… अडकवण्याचा घाट घातला तरी सुद्धा हे डबल इंजिनचं सरकार विरोधकांना कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय.. त्यामुळे हैराण झाले आहेत सगळे.’
तोडफोडीचा इतिहास आपण पाहिलाय… 1978 सालापासून.. महाराष्ट्र विसरलेला नाही. परंतु त्यांनी सांगितलं अमूक गुन्हे दाखल होतायेत… खोटे गुन्हे दाखल होत आहेत. मग यापूर्वी देखील म्हटलं आहे की.. नारायण राणे असतील, अर्णब गोस्वामी, गिरीश महाजन.. प्रविण दरेकर, रवी-नवनीत राणा असतील. आणि मागच्या वेळेस मी बोललो होतो देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये.. या सगळ्या गोष्टी कुठे चालल्या होत्या.
‘पण ती वेळ काय मी येऊ दिली नाही. त्याआधीच त्यांचा टांगा मी पलटी करून टाकला. 100 टक्के मोक्कामध्ये असता तुम्ही.. खोट्या मोक्कामध्ये.. नाही पण तुम्हाला आतमध्ये जाऊच दिलं नाही ना..’
ADVERTISEMENT
अधिक वाचा- Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे जितेंद्र आव्हाडांवर बरसले, दाखवला फोटो
खरं म्हणजे जे आवश्यक होतं.. ते आम्ही केलं आणि योग्य वेळेला आम्ही केलं. त्यामध्ये आम्ही घेतलेली भूमिका ही सर्वसामान्यांच्या मनातील भूमिका आहे.
‘विविध क्षेत्रात ज्यांची किर्ती आहे ती लोकं मला नेहमी सांगतात.. ज्या-ज्या कार्यक्रमात मी जातो तिथे ते मला सांगतात.. एकनाथराव तुम्ही फार धाडसी काम केलं.. जे राज्याच्या हिताचं होतं आणि योग्य वेळी केलं. पण आम्ही जे केलं ते छातीठोकपणे केलं. उघडपणे केलं.. लपूनछपून केलं नाही..’
ADVERTISEMENT
अधिक वाचा- Rahul Gandhi: “अदाणी भ्रष्ट माणूस, मोदी या व्यक्तीला का वाचवत आहेत?”
काही लोकं म्हणतात.. आजारपणाचा फायदा घेतला… सब झूट है.. स्वत: फोनवर बोलत-बोलत गेलाय हा एकनाथ शिंदे मोहिमेवर.. असं लपून-छपून केलं नाही.. तुम्ही काय केलं? तुम्ही ज्या लोकांचे नगरसेवक फोडले सात.. त्यांची काय परिस्थिती होती त्यावेळेस? माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या घरात मोठा मुलगा आणि त्यांचा पुतणा.. अशावेळी तुम्ही त्यांचे सात नगरसेवक फोडले तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही?
‘आम्ही जे केलं ते छातीठोकपणे केलं.. आम्ही लपूनछपून काही केलं नाही. जे करण्याची आवश्यकता होती 2019 साली ते न केल्यामुळे या ठिकाणी आम्ही दुरुस्ती आता केली.’ असं जोरदार भाषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT