‘ज्या’ उल्हासनगर प्रकरणावरून CM फडणवीस शिवसेना मंत्र्यांवर संतापले ‘ते’ नेमकं आहे तरी काय?
भाजप आणि शिवसेनेत सध्या एकमेकांच्या नेत्यांना आपआपल्या पक्षात घेण्यावरून बराच वाद सुरू आहे. पण या सगळ्याची नेमकी सुरूवात ही उल्हासनगरमधून झाली. जाणून घ्या ते नेमकं प्रकरण काय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भाजपचे सहा माजी नगरसेवक शिवसेना (शिंदे गट) आणि टीम ओमी कलानी (TOK) मध्ये सामील
उल्हासनगरमध्ये शिंदे-कलानी आणि चव्हाण-आयलानी यांची प्रतिष्ठेची लढाई
उल्हासनगर: भाजप शिवसेनेचेच (शिंदे गट) नेते फोडत आहे.. अशी तक्रार घेऊन शिंदेंचे मंत्री हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले होते. पण त्यांच्या तक्रारीला न जुमानता फडणवीसांनी मंत्र्यांनाच खडे बोल सुनावून टाकले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उल्हासनगरच्या एका प्रकरणाचा देखील उल्लेख केला. ते प्रकरण नेमकं काय आणि त्यावरून फडणवीस एवढे का चिडले हे सविस्तर जाणून घेऊयात.
उल्हासनगरमध्ये ठिणगी पडली, प्रकरण पोहचलं CM पर्यंत
एकीकडे बिहारच्या निवडणूक निकालाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे उल्हासनगरमध्ये मात्र शिंदे गटाने एक वेगळीच खेळी करत चक्क मित्र पक्ष असलेल्या भाजपाचं खिंडार पाडलं.
भाजपचे 6 माजी नगरसेवक व शहरातील तीन सर्वात प्रभावशाली व्यक्तींसह शेकडो कार्यकर्त्यांना शिवसेना (शिंदे गट) आणि तिचा सहयोगी टीम ओमी कलानी (TOK) मध्ये सामील करू घेतलं होतं.त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उल्हासनगर युनिटसाठी हा सर्वात मोठा राजकीय धक्का होता.
हे ही वाचा>> 'आज परत कोणीतरी गावी जाणार…' भाजपने शिंदेंचे नेते फोडताच आदित्य ठाकरेंनी डिवचलं, भलं मोठं ट्वीट अन्...
तर कलानी कुटुंबासाठी हा एक मोठा टर्निंग पॉइंटही आहे, कारण TOK ची राजकीय प्रभाव काही महिन्यांत कमकुवत झाला आहे, आता आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना आणि टीओकेमध्ये सहा माजी भाजप नेत्यांच्या प्रवेशामुळे कलानी गटाला नवीन बळ मिळाले आहे.










